School College Closed: 22 जानेवारीला दारुची दुकानं राहणार बंद; शाळांसह कॉलेजलाही सुट्टी

Ayodhya:राज्यातील सर्व शाळांना आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. तसेत अयोध्येत कुठेही मद्यविक्री होणार नाहीये. मंगळवारी याबाबत आदित्यनाथ यांनी आदेश जारी केलेत.
School College Closed
School College ClosedSaam tv
Published On

Ramlala Mandir:

गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय नागरिक राम मंदिराच्या उद्घाटनाची वाट पाहत आहेत. अशात २२ जानेवारी रोजी श्री रामलल्ला प्राण प्रतिष्ठापण सोहळा साजरा केला जाणार आहे. या सोहळ्यासाठी संपूर्ण देशात दिवाळी साजरी केली जाणार आहे. यासाठी अयोध्या नगरी देखील सजलीये. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील सर्व शाळांना आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. तसेत अयोध्येत कुठेही मद्यविक्री होणार नाहीये. मंगळवारी याबाबत आदित्यनाथ यांनी आदेश जारी केलेत.

School College Closed
Ulhasnagar Crime News : दोन हजाराची लाच घेतल्याप्रकरणी उल्हासनगर महापालिकेच्या मुकादमास अटक

२२ जानेवारीचा सोहळा पाहण्यासाठी देशभरातून अनेक नागरिक अयोध्येत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. आलेल्या सर्व नागरिकांना यावेळी अविस्मरणीय आदरातिथ्य मिळेल असा दावाही योगी यांनी केला आहे. 22 जानेवारीला सर्व शासकीय इमारती सजवण्यात याव्यात. तसेच आतिषबाजी करण्यात यावी आणि अयोध्येत स्वच्छतेचे 'कुंभ मॉडेल' राबवावे असे आदेश योगी आदित्यनाथ यांनी दिलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडणार आहे.

एका दिवसात राम लल्लाचं दर्शन घेऊन परतणं शक्य

४ जानेवारीपासून दिल्ली (Delhi) ते अयोध्या (Ayodhya) दरम्यान वंदे भारत ट्रेन सुरू होत आहे. ही ट्रेन आठवड्यातून ६ दिवस धावणार आहे. दिल्लीतील आनंद विहार येथून सकाळी ६.१० वाजता सुटणारी ही ट्रेन अवघ्या ८ तासांत आणि कमी थांब्यांमध्ये अयोध्येला पोहोचणार आहे.

भाडं किती असेल

वंदे भारत एक्स्प्रेसचे आनंद विहार टर्मिनल ते अयोध्येपर्यंत चेअर कारचे भाडे १ हजार ६२५ रुपये आहे. तर एक्झिक्युटिव्ह चेअर कारचे भाडे २ हजार ९६५ रुपये आहे. या ट्रेनच्या चेअर कारमध्ये तुम्हाला कानपूर सेंट्रल ते अयोध्या धाम प्रवास करायचा असेल, तर तुम्हाला ८३५ रुपये मोजावे लागतील.

School College Closed
Chhatrapati Sambhajinagar Accident News : हद्यद्रावक! बसचे चाक डाेक्यावरुन गेले, 5 वर्षाच्या बालकाचा मृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com