पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. येथे उभारण्यात आलेल्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मोदी भावुक झालेत. भाषणादरम्यान त्यांना अश्रू अनावर झाले.
हजारो मजूर कामगारांसाठी आम्ही जो संकल्प केला होता तो आज पूर्ण होत आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बनलेल्या देशातील सर्वात मोठ्या सोसायटीचं लोकार्पण होत आहे. मी स्वत: देखील येथे पाहाणी केली. त्यावेळी मला वाटलं की, मी लहान असताना माझ्या बालपणात मलाही अशा सुंदर घरात राहण्याची संधी मिळाली असती, अशी खंत मोदींनी व्यक्त केली आणि ते भावुक झाले.
आजही सोलापूर माझ्या हृदयात आहे. आपल्या देशात बऱ्याच वर्षांपासून गरिबी हटाओचे नारे दिले जात होते. तरीही गरिबी हटली नाही. गरिबांच्या नावाने योजना होत होत्या, पण त्याचा लाभ लाभार्थ्यांना मिळत नव्हता. तो पैसा मध्यस्थी लुटत होते. भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी आम्ही काम करत आहोत. मोदींनी गॅरंटी दिली की सरकारी लाभ थेट लाभार्थ्याला पोहोचेल, मध्यस्थी नाही, असं मोदी यावेळी म्हणाले.
२०१४ मध्ये सरकार येताच मी म्हणालो होतो की, माझं सरकार गरिबांसाठी समर्पित सरकार आहे. म्हणून आम्ही एकापाठोपाठ एक योजना सुरु केल्या. गरिबांचं आयुष्य सुखकर होण्यासाठी घर, शौचालय नसल्यामुळे गरिबांना पावलोपावली अपमानित व्हायला लागतं. विशेषतः महिला माता भगिनींना ही मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं होतं. त्यामुळे गरिबांना घर आणि शौचालय बांधण्यावर आम्ही भर दिला. १० कोटींहून अधिक शौचालय निर्माण करून गरिबांना दिले. आम्ही त्यांना प्रतिष्ठा दिली. गॅरंटी दिली, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.