PM Kisan Yojana Saam Tv
महाराष्ट्र

PM Kisan Yojana: मोठी बातमी! पीएम किसान योजनेतून या जिल्ह्यातील १,१९३ शेतकऱ्यांना वगळले, तुमचे तर नाव नाही ना?

PM Kisan Yojana These Farmers Will Not Get Installment: पीएम किसान योजनेतून अनेक लाभार्थ्यांचे अर्ज बाद केले आहेत. यवतमाळमधील ११९३ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

Siddhi Hande

पीएम किसान योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती

यवतमाळमधील ११९३ शेतकरी योजनेतून बाद

हजारो शेतकऱ्यांना मिळणार नाही योजनेचा लाभ

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना राबवण्यात आली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना दर वर्षी ६००० रुपये दिले जातात. या योजनेत आतापर्यंत २१ हप्ते देण्यात आले आहेत. दरम्यान, आता या योजनेतून हजारो शेतकऱ्यांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात नाराजी निर्माण झाली आहे.

यवतमाळमधील शेतकऱ्यांना वगळले (Yavatmal 1193 farmers Will Not Recieve PM Kisan Yojana)

यवतमाळ जिल्ह्यात एका कुटुंबात एका पेक्षा जास्त लाभार्थी असणाऱ्या अशा एक हजार 193 लाभार्थ्यांना पीएम किसान योजनेचा लाभातून बाद करण्यात आले आहे. यवतमाळमध्ये पीएम किसान योजनेत दोन लाख 91 हजार 377 पात्र लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा केली जाते. या योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात 21 व्या हप्ता जमा करण्यात आला.घरात एकापेक्षा जास्त शेतकऱ्यांची नावे आढळून आल्याने अशा शेतकऱ्यांना वगळण्यात आले आहे.

निकषात न बसल्याने शेतकऱ्यांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. या योजनेत एका कुटुंबातील फक्त १ व्यक्ती लाभ घेऊ शकतो. मात्र, एकापेक्षा जास्त व्यक्तींनी लाभ घेतल्याने कारवाई केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची पडताळणी केली जाते. त्यातून अपात्र लाभार्थ्यांना बाद केले जाते.

पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांच्या खात्यात २१ हप्ते जमा केले आहेत. मागच्या महिन्यात हे पैसे जमा केले होते. आता पुढचा हप्ता तीन महिन्यात जमा केले जाणार आहेत. या योजनेतील लाभार्थ्यांना हप्ता येण्यापूर्वी केवायसी करणे गरजेचे आहे. जर तुम्ही केवायसी केले नाही तर योजनेचा लाभ मिळणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : भोंदू अशोक खरातची आजची SIT चौकशी पूर्ण; कोर्टाकडे रवाना

Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात सर्वात मोठी घसरण! तब्बल ३३ हजारांनी झालं स्वस्त; वाचा खरेदीची हीच योग्य वेळ आहे का?

AC Side Effects: सतत एसीमध्ये बसून डोकं जड होतं? सावध रहा, शरीरावर होऊ शकतात गंभीर परिणाम

Ashok Kharat News : अशोक खरातचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल; माजी मंत्र्याला पाया पडल्यावर दिला कानमंत्र, VIDEO

Vastu Tips Of Financial Problem: घरामध्ये चुकूनही या 5 ठिकाणी जेवायला बसू नका, पैशांची तंगी सुरू होईल

SCROLL FOR NEXT