या शाळेत शिकवला जातो वृक्षारोपण विषय ! अभिजीत घोरमारे
महाराष्ट्र

या शाळेत शिकवला जातो वृक्षारोपण विषय !

कोरोना महामारीच्या काळात ऑक्सिजनची भासलेली कमतरता लक्षात घेत भंडारा जिल्ह्यातील उसर्रा शाळा प्रशासनाने वृक्षारोपण हा विषय शिकवण्याचा निर्णय घेतला आहे.

अभिजीत घोरमारे

भंडारा - आज पर्यंत आपण गणित, इंग्रजी, भूगोल, सामाजिक शास्त्रे, विज्ञान यांसारखे शाळेत विषय शिकलो आहोत. भंडारा जिल्ह्यातील उसर्रा जिल्हा परिषद शाळेने याच विषयांसोबत अजुन एका नवीन विषयाची भर अभ्यासक्रमात घातली आहे. आता चक्क 'वृक्षारोपण' हा विषय या शाळेने शिकवण्यास सुरुवात केली आहे. हि शाळा राज्यात 'वृक्षारोपण विषय' शिकवणारी पहिली शाळा ठरली आहे.

हे देखील पहा -

भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातिल उसर्रा गावात असणारी जिल्हा परिषदेची शाळा सध्या वृक्षारोपण विषय शिकवण्यामुळे चर्चेत आली आहे. या शाळेयामध्ये वृक्षारोपण विषय शिकवला जातो. झाडांच्या बिया मातीत मिसळून त्याचे सीड बॉल बनवून ते शास्त्रीय पद्धतीने जमिनीत रुजवण्याचे प्रात्यक्षिक या शाळेत शिकवले जाते. आठवड्यातून एक दिवस शाळेत वृक्षारोपनाची एक तासाची तासिका भरते. प्रत्येक विद्यार्थ्यांचा हा एक आवडता विषय बनला असल्याने वृक्षारोपणाची तासिका ही फुल्ल झालेली असते. एक महिन्यापासुन सुरु झालेल्या या तासिकेचा परिणाम म्हणजे मुलांनी तब्बल 1000 सीड बॉल तयार केले असून तब्बल 800 सीडबॉल चे वृक्षारोपण देखील केले आहे.

याबाबदल शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी सांगितले कि, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भंडारा जिल्ह्यात हाहाकार माजवत तब्बल 1130 लोकांचा बळी घेतला. त्यातही सर्वत्र ऑक्सीजनचा तुटवडा जिल्हाप्रशासनाला हैराण करणारा ठरला. लोकांची ऑक्सीजनसाठी झालेली मारामार तसेच कोरोना सारखा वायरस फैलण्यास कारणीभूत ठरलेले दूषित वातावरण आदी बाबी पाहता येणाऱ्या काळात आपल्याला पर्यावरण संवर्धन करणे संबंध मानवहितासाठी अत्यंत आवश्यक आहे.

भविष्यकाळात प्राणवायूची गरज लक्षात घेता नवीन पिढीला वृक्षारोपण व पर्यावरणाप्रत जागृत करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना वृक्षारोपनाची सवय लागावी जेणे करून परिसरात ऑक्सीजन वाढ होईल व पर्यावरण शुद्ध राहिल हाच उद्देश्य घेऊन उसर्रा जिल्हा परिषद शाळेने हा वृक्षारोपण विषय शिकवण्यास सुरुवात केली आहे. उसर्रा जिल्हा परिषद शाळेने वृक्षारोपण विषय शिकवण्याचा केलेला हा उपक्रम राज्यातील पहिला प्रयोग असून त्याला आता राज्यात इतर शाळांनी देखील अंगीकारणे गरजेचे आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सोन्याच्या भावात अचानक मोठी उलथापालथ! आठवड्यात सोनं तब्बल ₹३,४४० ने स्वस्त; पाहा १८, २२ अन् २४ कॅरेटचे नवे दर?

Maharashtra News Live Update: कृष्णराज महाडिक नेमके काँग्रेसचे की भाजपचे?

Supreme Court : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! महाराष्ट्रासह ८ राज्यातील उच्च न्यायालयांना नवे मुख्य न्यायाधीश; पाहा कोणाची कुठे नियुक्ती

Best Teas For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी 5 चहा ठरतील फायदेशीर; जाणून घ्या कोणते आहेत?

Ukadiche Modak Recipe : उकडीचे मोदक फाटतात? 'ही' ट्रिक वापरा, प्रत्येक मोदक बनेल परफेक्ट

SCROLL FOR NEXT