Viral image shows pitbull attacking 11-year-old boy in Mankhurd, Mumbai, during an alleged prank by the dog owner. Saam Tv
महाराष्ट्र

Viral Video Of Pitbull: थट्टा महागात पडली! मला कुत्रा चावत होता अन् मानखुर्दमधील मुलाने सांगितला थरार

Pitbull Attack On Child: मुंबईमध्ये पिटबुल कुत्र्यांची दहशत पाहायला मिळालीय. यावेळी लहान मुलांसोबत सुरु असणारी थट्टा मस्करी पिटबुलच्या मालकाला चांगलीच महागात पडलीय..काय नक्की घडलंय?

Suprim Maskar

मानखुर्दमध्ये 11 वर्षाच्या मुलासोबत सुरु असणारी ही थट्टा मस्करी पिटबुल मालकाच्या चांगलीच अंगलट आलीय. मुलाला घाबरवण्यासाठी कुत्र्याच्या मालकानं हा प्रताप केला.. मात्र अचानाक पिटबुलने मुलावर हल्ला केला... सुदैवानं पिटबुलच्या तावडीतून सुटका करुन घेत मुलाने तिथून पळ काढला, पण पिटबुलने त्याचा पाठलाग करत पुन्हा चावा घेतला...

या घटनेनंतर पीडित मुलानं वडीलांना सर्व हकीकत सांगितली. त्यामुळे मानखुर्द पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पिटबुलच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. याआधीही पिटबुल कुत्र्यानं लहान मुलांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्यात.. गाझियाबादमध्ये उद्यानात खेळणाऱ्या 10 वर्षाच्या मुलावर पिटबुलनं हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झाल्यानं मुलाच्या तोंडाला 150 टाके पडले..

दिल्लीतही घरासमोर खेळणाऱ्या तीन मुलांवर पिटबुल कुत्र्यानं हल्ला केला होता.. त्यामुळे पिटबुल कुत्रा किती घातक असतो..

पिटबुल किती घातक?

जगातील सगळ्यात घातक पाळीव कुत्रा

बुलडॉग आणि व्हाईट टेरियरची मिश्र प्रजाती

रागीट स्वभावामुळे पिटबुल माणसाचा जीवही घेऊ शकतो

41 देशात पिटबुल प्रजातीच्या कुत्र्यांवर बंदी

लखनऊमध्ये पिटबुलनं मालकिणीचे लचके तोडले होते

हल्ला करण्यासाठी कुप्रसिद्ध असणारे पिटबुल कुत्रे इतर कुत्र्यांपेक्षा अधिक शक्तीशाली मानले जातात. त्यामुळेच लढाऊ कुत्रे म्हणून त्यांची ख्याती आहे. जगात अनेक ठिकाणी डॉगफाइटिंग खेळासाठी ते उपयुक्त मानले जातात.. त्यामुळेच या कुत्र्यांवर देशात बंदी घालण्याची मागणी अनेकदा करण्यात आलीय. अशातच मुंबईतील घटनेनं पिटबुल कुत्रा चिमुरड्यांसाठी किती धोकादायक ठरू शकतो, हे अधोरेखित झालंयं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT