Pimpri Chinchwad News Saam tv
महाराष्ट्र

Pimpri Chinchwad : बांधकाम पाडले तर बाळाला फेकून आत्महत्या करेल; अतिक्रमण विरोधी पथकाला धमकावत शिवीगाळ, दोघांवर गुन्हा दाखल

Pimpri Chinchwad News : अधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकासमोर 3 वर्षाचा मुलगा इमारतीवरून खाली टाकण्याच्या उद्देशाने धमकी देत केली शिवीगाळ करण्यात आल्याने पथकाला अडचण निर्माण झाली.

गोपाळ मोटघरे

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिकेने अतिक्रमक केलेले बांधकाम पाडण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार सांगवी भागात गेलेल्या पथकाला तुम्ही आमचे बांधकाम पाडले तर माझ्या बाळाला खाली फेकून देईल व मी आत्महत्या करेल अशा शब्दात धमकावत कर्मचाऱ्यांना शिवीगाळ देण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अनधिकृत बांधकाम पाडण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार महापालिकेचे अतिक्रमण अधिकारी व कर्मचारी सांगवी भागात कारवाई करण्यासाठी आज गेले होते. यावेळी अतिक्रमण पडण्यास विरोध करण्यात आला. राजाराम लाड आणि निलेश लाड यांनी सांगवी भागात अनधिकृत बांधकाम केलेले बांधकाम पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला आमचे बांधकाम पाडले; तर मी माझ्या बाळाला खाली फेकून देईल व मी सुद्धा आत्महत्या करेल अशी धमकी दिली. 

कर्मचाऱ्यांना केली शिवीगाळ 

अतिक्रमण काढण्यासाठी महापालिकेच्या पथकासोबत पोलिसांचा फौजफाटा देखील उपलब्ध करण्यात आला होता. यावेळी घरासमोर आलेल्या पथकातील कर्मचाऱ्यांना आपल्या तीन वर्ष वयाच्या लहान मुलाला जाळी मधून खाली टाकण्याची धमकी दिली. तर बांधकाम पाडण्यासाठी अडथळा निर्माण करत पथकाला शिवीगाळ देखील करण्यात आली. यामुळे येथे बराच वेळ गोंधळ निर्माण झाला होता. 

दोघांविरोधात गुन्हा दाखल 
अतिक्रमण पडण्यास विरोध केल्याने राजाराम लाड आणि निलेश लाड यांच्या वर सांगवी पोलीस ठाण्यात बीएनएस कलम अंतर्गत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी राजाराम लाड, निलेश लाड या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच राजाराम आणि निलेश लाड हे फरार झाले आहेत. तर सांगवी पोलिसांकडून या दोघांचाही शोध सुरू करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेसचे जुने नाव काय आहे?

Girija Prabhu: साज ह्यो तुझा जीव माझा गुंतला ग...

Maharashtra Live News Update : 13 लाख घरे प्रधानमंत्री आवास योजनेतून बांधली.

अत्याचार अन् सामूहिक बलात्कारावर आळा घालण्यासाठी महिलांना पोलिसांचं अजब सल्ला; पोस्टर व्हायरल

वनतारामध्ये प्राण्यांची तस्करी, मृत्यूही... महादेवीच्या सुटकेसाठी राजू शेट्टींचा अंबानींवर घणाघात|VIDEO

SCROLL FOR NEXT