PMPML Bus Fire Saam tv
महाराष्ट्र

PMPML Bus Fire : धावत्या पीएमपीएमएल इलेक्ट्रिक बसला अचानक आग; दरवाजेही झाले लॉक, प्रवाशांची धावपळ

Pimpri Chinchwad News : आकुर्डी वरून निगडीच्या दिशेने जात असलेली आलेक्ट्रा इलेक्ट्रिक पीएमपीएमएल बसला अचानक भीषण आग लागली. त्यावेळी पीएमपीएमएल बस प्रवाशांनी पूर्ण भरलेली होती

गोपाळ मोटघरे

पिंपरी चिंचवड : प्रदूषण विरहित असलेल्या इलेक्ट्रिक बस रस्त्यावर धावू लागल्या आहेत. मात्र या बस प्रवाशांच्या जीवाला धोकेदायक ठरू लागल्या आहेत. कारण प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या धावत्या पीएमपीएमएल इलेक्ट्रिक बसने दुपारच्या सुमारास अचानक पेट घेतला होता. यामुळे बसमधील प्रवाशांचा पळापळ सुरु झाली होती. या प्रकारामुळे ओलेक्ट्रा इलेक्ट्रिक एमपीएमएल बसच्या सुरक्षेच्या प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

पुणे शहरात इलेक्ट्रिक बस धावत आहेत. या बसमुळे प्रवाशांची सोयीची ठरत आहे. तर दुसरी कडे या बसमुळे प्रदूषण देखील होत नाही. मात्र पुण्यात धावत असलेल्या पीएमपीएमएल बस रस्त्यावर धावत असताना अचानक आग लागल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात हडपसर परिसरात कॉम्प्रेसर फुटल्याने बसला आग लागल्याची घटना घडली असून आज पुन्हा एकदा धावत्या बसला आग लागल्याची घटना घडली आहे. 

अचानक आग लागून दरवाजे लॉक 

आकुर्डी वरून निगडीच्या दिशेने जात असलेली आलेक्ट्रा इलेक्ट्रिक पीएमपीएमएल बसला अचानक भीषण आग लागली. त्यावेळी पीएमपीएमएल बसला आग लागली त्यावेळी धावत्या पीएमपीएमएल बस मध्ये जवळपास ३५ ते ५० प्रवासी प्रवास करत होते. तसेच बस मध्ये अचानक आग लागल्याने प्रवासांमध्ये मोठी खळबळ निर्माण झाली. आग लागल्यानंतर बसचे दार उघडत नसल्याने प्रवासी प्रचंड भयभीत झाले होते.  

मोठी दुर्घटना टळली 

बसचे दरवाजे लॉक झाल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला होता. मात्र ऐनवेळी प्रसंगावधान राखून बस चालकाने दरवाजे उघडून प्रवासाची सुटका केली आहे. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. मात्र या घटनेने पीएमपीएमएलच्या ताफ्यात असलेल्या ओलेक्ट्रा इलेक्ट्रॉनिक बसच्या सुरक्षेच्या प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mouth Ulcer Symptoms: तोंड येण्यापुर्वी कोणती लक्षणे दिसतात?

'तु कोण आहेस रे? छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर प्रहार, दिलं निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचं आव्हान

Maharashtra Politics: अजित पवारांविरोधात मोहोळ यांचा शड्डू; पवारांच्या वर्चस्वाला भाजपकडून सुरुंग?

Sachin Ghaiwal: 'मंत्रिमंडळ की गुंडांची टोळी'; सचिन घायवळच्या शस्त्रपरवान्यावरुन राऊतांचा प्रहार

निवडणूक आयोगाकडे 'ती' ऑडिओ क्लिप देऊ, बदमानी करू; ३० लाखाच्या खंडणीसाठी भाजप महिला नेत्याला धमकीचा फोन

SCROLL FOR NEXT