Pimpri Chinchwad Saam tv
महाराष्ट्र

Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवडमध्ये १ कोटी ३२ लाख किमतीचा गांजा जप्त; टेम्पोतून वाहतूक, पोलिसांची मोठी कारवाई

Pimpri Chinchwad News : पोलिसांनी पेट्रोलिंग कारवाई करत टेम्पोची तपासणी केली. यामध्ये मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला होता. या कारवाईत साधारण २६४ किलो गांजा पोलिसांनी जप्त केला आहे

गोपाळ मोटघरे

पिंपरी चिंचवड : गांजा तसेच अमली पदार्थही तस्करी व विक्रीस बंदी असताना देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जात असल्याचे अनेकदा समोर आले आहे. त्यानुसार पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पोलीस पथकाने पुणे- नाशिक महामार्गावर मोठी कारवाई करत एका टेम्पोतून जवळपास एक कोटी ३२ लाख रुपये किमतीचा २६४ किलो २२६ ग्रॅम गांजा जप्त केला आहे.

पुणे- नाशिक मार्गावरील नाणेकरवाडी जवळ एका टेम्पोमध्ये गांजा ह्या अंमली पदार्थाची वाहतूक करण्यात येत असल्याची गोपनीय माहिती अंमली पदार्थ विरोधी पोलीस पथकाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पेट्रोलिंग कारवाई करत टेम्पोची तपासणी केली. यामध्ये मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला होता. या कारवाईत साधारण २६४ किलो गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. 

दोघेजण ताब्यात 

दरम्यान गांजा वाहतूक करणाऱ्या राम व्यंकट पितळे (वय २५) आणि श्रेयश प्रदीप चव्हाण (वय २१) या दोन जणांना ताब्यात घेतले आहे. या दोन्ही आरोपींनी एवढा मोठ्या प्रमाणात गांजा कुठून आणला व ते कुणाला विक्री करणार होते. याचा तपास सध्या अंमली पदार्थ विरोधी पोलीस पथक करत आहे; अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या वतीने देण्यात आली.

संभाजीनगरात १७ लाखाची तंबाखू जप्त 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवैधरित्या बंदी असल्या गुटख्याची सर्रास वाहतूक आणि विक्री होते. त्यानुसार संभाजीनगर जिल्ह्यात अवैधरीत्या वाहतूक केल्या जाणाऱ्या गुटख्यावर ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात ठिकठिकाणी नाकाबंदी करून अवैधरित्या प्रतिबंधात्मक गुटख्याची वाहतूक करणारे वाहन पकडण्यात आले. या कारवाईत १७ लाख १७ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. मात्र आरोपी कार सोडून घटनास्थळावरून पळून गेले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samruddhi Highway Accident : समृध्दीवर भयंकर अपघात, ८ जणांचा जागीच मृत्यू, ट्रकच्या धडकेत पिकअपचा चुराडा

Maharashtra Live News Update : पुणे शहरासह जिल्ह्याला आजही यलो अलर्ट

India Tourism : लाल दगड अन् संगमरवरी कला, 'हा' वास्तुकलेचा अद्भुत नजारा पाहून तुमचे डोळे दिपतील

Ladki Bahin Yojana: पात्र आहात, ईकेवायसीही केली, पण हप्ता बंद; ₹१५०० मिळवण्यासाठी लाडक्या बहि‍णींनी काय करायचं?

Kelyacha Sheera Recipe: संध्याकाळी गोड खाण्याची इच्छा होते? मग झटपट घरच्या घरी बनवा मऊसूद आणि चविष्ट केळ्याचा शिरा

SCROLL FOR NEXT