Ganesh Festival : पुण्यात ढोल- ताशा पथकांना सरावासाठी हवी जागा; भाजपकडून महापालिकेला जागेसाठी निवेदन

Pune News : राज्य सरकारने गणेशोत्सव राज्य महोत्सव असल्याचे जाहीर केले. दुसरीकडे राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात जिथून झाली. त्या पुण्यनगरीमध्ये ढोल-ताशा पथकांना सरावासाठी जागाच उपलब्ध नाहीत
Pune News
Pune NewsSaam tv
Published On

अक्षय बडवे 
पुणे
: दीड महिन्यावर गणेशोत्सव असल्याने त्या अनुषंगाने ढोल पथकांचा सराव सुरु झाला आहे. तर पुण्यातील ढोल ताशे पथकांना महापालिकेची मोकळी जागा सरावासाठी उपलब्ध करून द्याव्या अशी मागणी भाजपने आज केली आहे. पुणे शहरातील भाजपच्या शिष्टमंडळाने महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेत याबाबत निवेदन सुद्धा दिले आहे. 

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल ताशे पथकांचे महिना- दीड महिन्यापासून सराव सुरु करण्यात येत असतो. यासाठी पुणे शहरातील भाजपचे एक शिष्ट मंडळ तसेच त्यांच्यासोबत पुणे ढोल ताशा महासंघाचे काही पथकांचे प्रमुख आणि पदाधिकारी यांनी आज पुणे महापालिकेच्या आयुक्त नवल किशोर राम यांना भेटून याबाबतचं निवेदन दिले आहे.

Pune News
Pandharpur Crime : पंढरपुर हादरले! माय लेकाची घरात घुसून हत्या; मारेकरी घराला कुलूप लावून पसार

एकीकडे राज्य सरकारने गणेशोत्सव हा राज्य महोत्सव असल्याचे जाहीर केले आहे आणि दुसरीकडे राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात जिथून झाली. त्या पुण्यनगरीमध्ये ढोल-ताशा पथकांना सरावासाठी जागाच उपलब्ध नाहीत. ढोल-ताशा पथकांसाठी दैनदिन सराव आवश्यक असतो. मात्र पुण्यातील ढोल-ताशा पथकांना रोज सराव करण्यासाठी सध्या पुरेशी जागा उपलब्ध नाही. या पथकांना सराव करण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात मोकळ्या जागेची गरज आहे.

Pune News
Mahadev Munde Case : महादेव मुंडेंच्या कुटुंबीयांचा आत्मदहनाचा प्रयत्न; पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंवर उपचार सुरु, आरोपीला अटक होत नसल्याने कुटुंबीय आक्रमक

हे ठिकाणे सुचविण्यात आले 
गणेशोत्सव अवघ्या महिन्यावर आला आहे आणि अजूनही काही पथकांचा दैनंदिन सराव सुरू झालेला नाही. या पार्श्वभूमीवर आता महापालिकेने त्यांच्या ताब्यातील पुण्याच्या मध्यवस्तीतील मोकळ्या जागा ढोल- ताशा पथकांना सरावासाठी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. पुणे महापालिकेकडे सणस मैदान, नेहरू स्टेडियम, महापालिकेच्या शाळांचे मैदाने अशी विविध मैदाने उपलब्ध आहेत. यापैकी जी योग्य असतील ती तात्पुरत्या स्वरुपात ढोल- ताशा पथकांना उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी भाजप कडून करण्यात आली आहे.

पुणे शहर भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले, पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी आकर्षणाचा आणि अभिमानाचा सोहळा असतो. या सोहळ्यासाठी विविध भागांतून नागरिक गणेशोत्सवाच्या काळात पुण्यात येतात. पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये ढोल -ताशा पथके प्रमुख आकर्षण आहे. तर ढोल ताशा महासंघाचे ॲड अनिश पाडेकर म्हणाले, ढोल ताशा पथकांना मोकळ्या जागा मिळाव्यात याची मागणी आहे. बहुतांश ढोल ताशा पथक यांचा सराव संध्याकाळी सहा ते नऊ या दरम्यान होत असतो. रात्री नऊ नंतर सर्व पथक सराव संपवतात त्यामुळे नागरिकांनाही त्रास होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com