YCM Hospital Saam tv
महाराष्ट्र

YCM Hospital: बोगस पावती पुस्तक वापरून लाखोंचा गंडा; वायसीएम रुग्णालयालात कर्मचाऱ्यानेच केली फसवणूक

Pimpri Chinchwad News : बीव्हीजी या कंपनीचा कत्राटी कर्मचारी आहे. फसवणूक केल्याच्या प्रकरणात त्याची सध्या वायसीएम हॉस्पिटल प्रशासनाकडून चौकशी

गोपाल मोटघरे

Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात कॅश काऊंटरवर (Pimpri Chinchwad) लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. येथे काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्याने (Fraud) बोगस पावती पुस्तक वापरून वाय. सी. एम. रुग्णालयाला लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. (Tajya Batmya)

पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या वाय सी एम रुग्णालयातील कॅश काऊंटर क्रमांक ४४ वर आदित्य खंडागळे हा काम करत होता. कंत्राटी पद्धतीने त्याची निवड झाली होती. तो दुपारी दोन ते रात्री दहा या दरम्यान आदित्य खंडागळे हा रुग्णालयात ड्युटीवर असायचा. या दरम्यान येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना बनावट पावती पुस्तकची पावती देऊन हजार रुपयाची लूट करत असल्याचे प्राथमिक तपास उघडकीस आला आहे. यात त्याने लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चौकशी सुरु 

आदित्य खंडागळे हा भारत विकास ग्रुप अर्थात बीव्हीजी या कंपनीचा कत्राटी कर्मचारी आहे. फसवणूक केल्याच्या प्रकरणात त्याची सध्या वायसीएम हॉस्पिटल प्रशासनाकडून चौकशी करण्यात येत आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर आदित्य खंडागळे याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल; असे वायसीएम हॉस्पिटलचे अधिष्ठता राजेंद्र वाबळे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रवाशांच्या जीवाशी खेळ! इडलीसाठी वापरलं शौचालयाचं पाणी|VIDEO

Maharashtra News Live Update: यवतमाळ जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण

Gadchiroli : फ्लॅटमध्ये भलताच कारभार सुरू; पोलिसांना कुणकुण, दोन इंजिनिअर भावांना अटक, नागपूर कनेक्शन उघड

Pune crime news: पुण्यात रक्तरंजित थरार! बायकोशी अफेअर असल्याचा संशय; नवऱ्याने तरुणाला क्रूरपणे संपवलं

Crime: हात-पाय बांधले, तोंडात कापड कोंबलं; नंतर महिलेला जागीच संपवलं, गावात उडाली खळबळ

SCROLL FOR NEXT