Diwali निमित्त चाकरमनी निघाले गावी, एका बसमध्ये 150 प्रवासी; RTO ची डाेळेझाक

मृत्यूच्या सोदागरांसोबत नेमके काेणाचे लागेबांधे आहेत असा प्रश्न उपस्थित हाेऊ लागला आहे.
pimpri chinchwad crime news
pimpri chinchwad crime newssaam tv
Published On

Pimpri Chinchwad News :

खासगी लक्झरी बसचा प्रवास अनेकांसाठी सुखकारक असू शकतो. मात्र पिंपरी चिंचवड मधून खासगी बस नाही तर अक्षरशः जिवंत शव पेट्याच धावतायतात की काय असं तुम्हाला वाटेल. कारण केवळ 50 प्रवाशांची आसन क्षमता असलेल्या लक्झरी बसमधून तब्बल दीडशेपेक्षा प्रवाशांची वाहतूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. (Maharashtra News)

pimpri chinchwad crime news
Pune Metro News : रविवारी पुणे मेट्रोतून प्रवास करणार आहात? जाणून घ्या वेळेतील बदल

उद्योगनगरी पिंपरी चिंचवड येथून एका खासगी लक्झरी बसमधून जनावरांसारखी माणसं भरुन परराज्यात नेण्यात येत आहेत. हे प्रवासी पिंपरीतून नेपाळ आणि उत्तर प्रदेश मध्ये जाणार असल्याची माहिती मिळत आहे. हे वाचून कदाचित आश्चर्य वाटेल मात्र हे खरं आहे.

पिंपरी चिंचवड शहर उद्योग नगरी असल्याने या शहरात शेकडो परप्रांतीय कामगार वास्तव्यास आहेत. कामगार असल्याने आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने दिवाळी आणि छट पुजेसारख्या सणासाठी आपल्या गावी जाण्या-या कामगारांची खासगी बस चालक अक्षरशः लूट करतात.

त्यामूळे बेकायदेशीर असूनही केवळ कमी पैशात प्रवास करणे परवडते म्हणून हे कामगार जीव धोक्यात घालून प्रवास करतात. दुसरीकडे हे सगळं उघड उघड दिसत असूनही त्याकडे दुर्लक्ष करणारे परिवहन अधिकारी केवळ सरकारी उत्तरे देऊन वेळ मारून नेण्यातच धन्यता मानतात.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पिंपरी चिंचवड शहरातील चिखली परिसरातून दर आठवड्याला असे प्रवासी कोंबून नेले जातात. त्याशिवाय या गाड्यांमधून काही टन मालही चोरून नेला जातोय. त्यामुळे यंत्रणा अशा वाहतुकीची कुठेच तपासणी करत नाही की त्यांचे देखील मृत्यूच्या सोदागरांसोबत लागेबांधे आहेत हा प्रश्न निर्माण होत आहे.

Edited By : Siddharth Latkar

pimpri chinchwad crime news
Diwali 2023 : दिवाळीच्या लगबगीत बुरखाधारी महिलांनी साधला डाव, डायमंड चाेरीने सराफ बाजारात खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com