Pimpri Chinchwad News Saam tv
महाराष्ट्र

Pimpri Chinchwad News: होर्डिंग अपघात प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

होर्डिंग अपघात प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

रोहिदास गाडगे

Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवड शहरातील रावेत परिसरात सोमवारी झालेल्या होर्डिंग अपघातात (Accident) पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या प्रकरणात (pimpri Chinchwad) रावेत पोलिसांनी स्वतःहून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. (Latest Marathi News)

सोमवारी संध्याकाळी वादळी वाऱ्यामुळे बेंगलोर- मुंबई हायवे लगत असलेल्या स्वामी हॉटेलजवळ एक मोठी अनधिकृत होर्डिंग वादळी वाऱ्यामुळे खाली पडली. यामुळे पाच निष्पाप जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत शोभा विजय टाक (वय ५०), वर्षा विलास केदारी (वय ५०), रामअवध प्रलाद आत्मज (वय २९), भारती नितीन मंचल (वय ३३) आणि अनिता उमेश रॉय (वय ४५) या पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर याच दुर्घटनेत तीन जण हे गंभीर जखमी झाले आहेत.

दोषींना अटक करण्यासाठी चार पथक

प्रकरणात आता रावेत पोलिसांनी जागा मालक नामदेव बारकू म्हसुडगे, होर्डिंग बनवणारा दत्ता गुलाब तरस, होर्डिंग भाड्याने घेणारा महेश तानाजी गाडे आणि जाहिरात करणारी कंपनी व इतर संबंधित व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ह्या होर्डिंग दुर्घटनेतील दोषी आरोपींना अटक करण्यासाठी रावेत पोलिसांनी चार पोलिसांचे पथक तयार केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HPCL Recruitment: हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये नोकरीची संधी, पगार २.८ लाख रुपये; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Thackeray: काही तासांत ठाकरेंची तोफ धडाडणार; युतीची घोषणा होणार? आधी अन् शेवटी कोण भाषण करणार? A टू Z माहिती..

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मनसेने छापले खास टीशर्ट, पाहा व्हिडिओ

Salman Khan : रक्तबंबाळ शरीर अन् डोळ्यात आग; सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान'चं पोस्टर रिलीज, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT