Bhujbal Bridge Saam tv
महाराष्ट्र

Bhujbal Bridge : वाकडच्या भुजबळ चौक उड्डाण पुलावर दुचाकीस बंदी; वाहतूक विभागाकडून वेळ निश्चित

Pimpri Chinchwad News : भुजबळ उड्डाण पुलावरून वाहतूक कोंडीची समस्या दररोज निर्माण होत असते. यावर पर्याय म्हणून वाहतूक विभागाकडून पुलावरून दुचाकी धारकांना प्रवेश बंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

रोहिदास गाडगे

पिंपरी चिंचवड : सकाळी व सायंकाळी चाकरमान्यांची वर्दळ अधिक असते. शिवाय अन्य वाहनांमुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असल्याने वाकड येथील भुजबळ चौक उडान पुलावरून जाण्यास दुचाकी वाहन चालकांना बंदी घालण्यात आली आहे. भुजबळ चौक उड्डाण पुलावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या वाहतूक विभागाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 

पिंपरी चिंचवड शहरातून वाकड, हिंजवडीकडे जाण्यासाठी या पुलाचा वापर अधिक होत असतो. प्रामुख्याने सकाळी व सायंकाळी पुलावरून अधिक रहदारी असते. चाकरमाने ड्युटीवर जाण्यासाठी व घरी जाण्यासाठी दुचाकीने जात असतात. दरम्यान सर्वच वाहने या पुलावरून जात असल्याने सकाळी व सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असतो. हि वाहतूक कोंडी होऊ नये; यासाठी वाहतूक विभागाकडून दुचाकी चालकांना पुलावरून जाण्यास बंदी करण्यात आली आहे. 

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निर्णय 

दर दिवशी भुजबळ चौक येथील उडान पुलावरून वाकड, पिंपळे सौदागर आणि हिंजवडीच्या दिशेने मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहन चालक प्रवास करत असतात. त्यामुळे या उडान पुलावर वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणात उद्भवते. हीच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हिंजवडी आणि वाकड वाहतूक विभागाच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थात दुचाकी चालकांना अन्य मार्गाचा वापर करावा लागणार आहे. 

दोन आठवड्यांसाठी बंदी 

वाहतूक विभागाकडून घेण्यात आलेल्या निर्णयानुसार सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ९ वाजता या कालावधीत दुचाकी वाहन चालकांना उडान पुलावरून जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. पुढील दोन आठवड्या पर्यंत ही बंदी असणार आहे अशी माहिती हिंजवडी वाकड वाहतूक विभागाच्या वतीने देण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले? VIDEO

Maharashtra Live News Update: बेस्टच्या 150 नवीन इलेक्ट्रॉनिक बस गाड्यांचा लोकार्पण सोहळा लवकरच

Blood Transfusion: शरीरात चुकीच्या 'ब्लड ग्रुप'चे रक्त चढवल्यास काय होते?

The Family Man 3: द फॅमिली मॅन सीझन ३ होणार 'या' दिवशी प्रदर्शित; हे दोन सुपरस्टार दिसणार खास भूमिकेत

Blood Sugar: सावधान! शुगर वाढण्यामागील कारण फक्त जेवण नव्हे; तज्ज्ञांनी सांगितल्या ५ चुकीच्या सवयी, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT