Pimpri Chinchwad Crime Saam tv
महाराष्ट्र

Pimpri Chinchwad Crime: दरोड्याचा प्रयत्न असफल; दबा धरून बसलेल्या दरोडेखोरांना अटक

Pimpri Chinchwad दरोड्याचा प्रयत्न असफल; दबा धरून बसलेल्या दरोडेखोरांना अटक

रोहिदास गाडगे

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील वाकड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास दरोडा (Pimpri Chinchwad) टाकण्याच्या प्रयत्न असफल झाला आहे. कोयत्यासारखे धारदार शस्त्र आणि मिरची पूडच्या मदतीने दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांना वाकड पोलिसांनी (Police) बेड्या ठोकल्या आहेत. (Latest Marathi News)

पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव परिसरातील साहील एलिगंस सोसायटी समोर काही संशियत व्यक्ती मध्यरात्री तीन वाजता दरम्यान धारदार शस्त्रासोबत दबा धरून बसल्याची खात्रीशीर माहिती वाकड पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच वाकड पोलिसांनी माहिती मिळालेल्या स्थळी पोहचून चार दरोडे खोरांना बेड्या ठोकल्या आहेत. तर एक दरोडे खोर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार होण्यात यशस्वी झाला आहे. बेड्या ठोकण्यात आलेल्या दरोडेखोरांकडून तीन लोखंडी कोयते, मिरची पुड, एक मोबाईल फोन, एक तीन चाकी टेम्पो आणि मोपेड दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. 

अटक केलेल्यांवर यापूर्वीही गुन्हे 

पोलिसांनी श्याम हरी गाडवे, अतिश भारत शिरसाट, नवनाथ दिगंबर साठे आणि शुभम सिद्राम कांबळे अशी बेड्या ठोकलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. तर करण उर्फ कला टाक हा दरोडेखोर फरार आहे. बेड्या ठोकण्यात आलेले दरोडेखोर हे रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार असून त्यांच्यावर वाकड, पिंपरी, चिंचवड, सांगवी आणि तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday horoscope: या ४ राशींच्या लोकांसाठी मंगळवारचा दिवस महत्त्वाचा; नोकरी आणि पैशांच्या बाबतीत काय घडणार?

सरकारचे 200 अधिकारी आमच्या संपर्कात; राहुल गांधींच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

पुणेकरांनो ऐकलं का! शहरात १० टक्के पाणी कपात; पुणे महापालिकेचा पाणी बचतीसाठी नवीन प्लॅन काय?

Nigdi Crime : मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पुण्यातील निगडीत संताप

Maharashtra News Live Update: राज्यातील शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील ३ लाख ५१ हजार शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर

SCROLL FOR NEXT