Pimpri Chinchwad News Saam tv
महाराष्ट्र

Pimpri Chinchwad News : पिंपरी चिंचवडमध्ये कारमध्ये सापडले ३५ लाख; पोलिसांकडून रक्कम जप्त

Pimpri chinchwad news : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासून पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्हा व राज्य सीमावर्ती भागात पोलिसांकडून नाकाबंदी करत प्रत्येक वाहनांची तपासणी केली जात आहे

रोहिदास गाडगे

पिंपरी चिंचवड : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाकडून नाकाबंदी करत वाहनांची तपासणी केली जात आहे. दरम्यान पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान ३५ लाख ११ हजार २०० रुपयांची रोख रक्कम आढळून आली असून सदरची रक्कम जप्त केली आहे.

विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासून पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्हा व राज्य सीमावर्ती भागात (Police) पोलिसांकडून नाकाबंदी करत प्रत्येक वाहनांची तपासणी केली जात आहे. या तपासणीत अनेक ठिकाणी रोख रक्कम आढळून आली आहे. त्यानुसार चाफेकर चौक येथे पोलीस पेट्रोलिंग करत असताना एका चार चाकी (Pimpri Chinchwad News) वाहनातून पोलिसांनी ३५ लाख ११ हजार २०० रुपये इतकी रोख रक्कम जप्त केली आहे. 

रक्कमेबाबत पोलिसांकडून तपास सुरु 

पोलिसांनी जप्त केलेली रोख रक्कम चिंचवड विधानसभा क्षेत्राच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या व्हिजिलन्स स्कॉडकडे सुपूर्द केली आहे. आता ही रक्कम कुणाची आहे आणि कुठल्या कारणासाठी आणण्यात आली होती ? याची माहिती घेऊन कारवाई निवडणूक निर्णय विभाग कारवाई करणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नॅशनल हायवेवर भीषण अपघात; भरधाव डंपरची बसला धडक, १० जणांचा जागीच मृत्यू, मध्यरात्री नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update : रोहित पवारांना नाशिकच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

Suraj Chavan Wife Emotional: सासरी जाताना भावाच्या गळ्यात पडून रडली संजना, सुरजच्या बायकोचा भावनिक व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

शिवाजी महाराजांना छत्रपती का संबोधलं जातं? जाणून घ्या ऐतिहासिक अर्थ

Mumbai: प्लॅटफॉर्मवर बसून पाहत होता पॉर्न व्हिडीओ, महिलेने तरुणाला धडा शिकवला; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT