पिंपरी चिंचवड : मार्च एंडिंग जवळ येत असल्याने मालमत्ता कराची थकबाकी वसुली करण्यावर भर दिला जात आहे. प्रामुख्याने महापालिका हद्दीत असलेल्या थकबाकी धारकांविरुद्ध मोहीम राबविली जात असून यात पिंपरी चिंचवड महापालिकेने देखील थकबाकी वसुली करण्यासाठी सुरवात केली असून शहरात करोडोच्या घरात थकबाकी आहे. दरम्यान महापालिकेने आतापर्यंत थकबाकीदार असलेल्या ४१८ जणांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत.
आर्थिक वर्ष समाप्तीच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर संकलन विभागाने शहरातील एक लाखांहून अधिक थकबाकी असणाऱ्या सर्व बिगर निवासी औद्योगिक, मिश्र निवासी मालमत्तांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कर बुडव्या थकबाकीदारांच्या मालमत्ता तात्काळ जप्त करण्याचे आदेश देखील महापालिकेच्या कर संकलन विभागाने अधिकाऱ्यांना दिले आहेत.
आता थेट जप्तीची कारवाई
कर बुडव्या थकबाकीदारांना वारंवार नोटीस आणि सूचना देऊनही कराचा भरणा न केल्यामुळे आता जप्तीची कारवाई सुरू करण्यात आली आहे. यात खाजगी संस्था, महाविद्यालये व शाळा, हॉटेल, खाजगी रुग्णालये, पेट्रोलपंप, औद्योगिक कारखाने, शोरुम, मंगल कार्यालय, बँका, मॉल, चित्रपटगृहे आदी मालमत्तांचा समावेश आहे. या मालमत्ता धारकांकडे कोटींच्या घरात थकबाकीची रक्कम पोहचली आहे. यामुळे हि वसुली करण्यात येत आहे.
आतापर्यंत ४१८ मालमत्ता जप्त
कर थकबाकीदार असलेल्या मालमत्ता धारकांवर मागील काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड महापालिकेने कारवाई करण्यात सुरवात केली आहे. यात पालिका प्रशासनाने आतापर्यंत केलेल्या कारवाईत ४१८ मालमत्ता जप्त केल्या आहेत. जप्तीची कारवाई करण्यात आलेल्या या मालमत्ताधारकांकडे तब्ब्ल ११ कोटी ३७ लाख २३ हजार १९८ रुपयांचा मालमत्ता कर भरला नसल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.