Shahapur Forest Aria : कुऱ्हाड बंदी करून राखले ४१६ हेक्टर जंगल; खोस्ते गावातील ग्रामस्थांनी दोन वर्षांपासून निर्णय

Shahapur News : आदिवासी समाजाची जीवनशैली ही कायमची निसर्गावर अवलंबून असते. सर्व जीवन वनावर अवलंबून असलेला समाज त्यांच्या रोजच्या अन्न आणि पाणी सारख्या गरजा जंगलावर पिढ्यानपिढ्या भागवीत आलेले आहेत
Shahapur Forest Aria
Shahapur Forest AriaSaam tv
Published On

फैय्याज शेख 

शहापूर : आजच्या घडीला वृक्ष तोड मोठ्या प्रमाणात करत त्यावर अतिक्रमण केले जात आहे. यामुळे वस्ती वाढतेय व जंगल नष्ट होत चालले आहे. मात्र शहापूर तालुक्यातील मौजे खोस्ते या गावातील ग्रामस्थांनी दोन वर्षांपासून कुऱ्हाड बंदी केली आहे. या कारणामुळे परिसरातील तब्बल ४१६ हेक्टर इतके जंगल क्षेत्र राखता आले आहे. याचा फायदा आता आदिवासी समाजाला होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे.  

आदिवासी समाजाची जीवनशैली ही कायमची निसर्गावर अवलंबून असते. सर्व जीवन वनावर अवलंबून असलेला हा समाज त्यांच्या रोजच्या अन्न आणि पाणी सारख्या गरजा आसपासच्या जंगलावर पिढ्यानपिढ्या भागवीत आलेले आहेत. मात्र काही काळापासून आदिवासी समाजाला त्यांच्या हक्कांपासून मुकावे लागले. अनेक कायद्याच्या कचाट्यात अडकून ही जनजाती वनापासून दूर गेली. परंतु हा दूरावा अधिसूचित, अनुसूचित जमात व इतर पारंपारिक वन निवास वन हक्क मान्य कायदा अधिनियम सुधारित कायद्यानुसार वन हक्क कायद्यामुळे यांना जंगल प्राप्त झाले आहे. याचे संवर्धन करण्यासाठी आदिवासी समाज पुढे आला आहे. 

Shahapur Forest Aria
Wardha News : नवीन घरात जाण्याचे स्वप्न राहिले अपूर्ण; भिंतीवर पाणी मारताना झाला घात, महिलेचा मृत्यू

२०२२ मध्ये घेतला निर्णय 

शहापूर तालुक्यातील मौजे खोस्ते गावातील अनुसूचित जमातीच्या लोकांनी एकत्र येऊन समूहहक्क वन हक्क दावा सादर केला होता. अनेक वर्षाच्या चर्चा, सभा आणि संघर्षातून ३ जानेवारी २०२२ रोजी ४१६ हेक्टर इतका जंगल क्षेत्रावर सामूहिक वन हक्क प्राप्त झाले. खोस्ते गावातील ग्रामस्थांनी कुऱ्हाड बंदीचा निर्णय घेतला. यानंतर तब्बल दोन वर्षांनी जंगल राखल्याने या जंगलापासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा फायदा गावातील ग्रामस्थांना घेता येत आहे. 

Shahapur Forest Aria
Water Shortage : जलकुंभावर चढत महिलांचे शोले स्टाईल आंदोलन; हिंगोलीच्या नांदुरा गावात पाणी समस्या

ग्रामस्थांनी साजरा केला वर्धापन 

जंगलातून मोह, करवंद, रानभाज्या, पळसाची पाने आदी उत्पन्न हे या गावातील ग्रामस्थांनी समीतीच्या माध्यमातून घ्यायचे आहे. यामुळे या गावातील कुटुंबांना मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झाले आहे. म्हणून या गावातील ग्रामस्थांनी वर्धापनदिन मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला. अशाच प्रकारे वन विभागाच्या जंगलालगत असलेल्या गावांनी जर निर्णय घेतले; तर मोठ्या प्रमाणात वनसंपत्ती राखली जाईल पण यापासून उत्पन्न देखील मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com