Pune Traffic Jam News saam tv
महाराष्ट्र

Pimpri-Chinchwad Traffic Jam: पिंपरी-चिंचवडमधील भूमकर चौकात प्रचंड वाहतूक कोंडी, वाहनाच्या लांबचलांब रांगा

Bhumkar Chowke Traffic Jam: पिंपरी-चिंचवड शहरातील भूमकर चौक येथे मुंबई-बेंगलोर हायवेवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

गोपाल मोटघरे

Pune Traffic Jam News: पिंपरी-चिंचवड शहरातील भूमकर चौक येथे मुंबई-बेंगलोर हायवेवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. या वाहतूक कोंडीमुळे हायवेवर लांब वाहनाच्या मोठमोठ्या रागा लागल्या आहेत.

आयटी नगरी हिंजवडीकडे जाणाऱ्या रस्त्यातील वाहतूक कोंडीची समस्या दूर व्हावी म्हणून वाकड वाहतूक पोलिसांनी दोन दिवसांपासून प्रायोगिक तत्त्वावर भूमकर नगर, विनोदे नगर, विनोदे चौक, लक्ष्मी चौक या मार्गात एकेरी वाहतूक सुरू केली आहे.

या प्रयोगामुळे भूमकर चौकाने बऱ्यापैकी मोकळा श्वास घेतला. मात्र कस्तुरी चौक, विनोदे नगर चौक अन लक्ष्मी चौक रस्त्यावर वाहनांच्या मोठाल्या रांगा लागत आहेत. एवढेच नाही तर स्थानिक रहिवाशांना शंभर मीटर अंतरावरील घरी जाण्यासाठी तब्बल दोन ते तीन किमीचा वळसा मारून आपल्या घरी जावे लागत असल्याने स्थानिक रहिवाशी प्रचंड नाराज आहेत. (Pune News)

वाहतूक पोलिसांचे प्रायोगिक तत्व अन रहिवाशांचे सत्व अशी चर्चा वाकड-हिंजवडी परिसरात जोरावर आहे. रहिवाशांनी अन्य काही तोडगा काढून या वाहतुक कोंडीतून मुक्तता करावी अशी विनंती वाहतूक पोलीस प्रशासनाला केली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धनंजय मुंडेंना मोठा दिलासा करुणा शर्मा मुंडे यांची याचिका परळीच्या न्यायालयाने फेटाळली

Pune election : पुण्यात मनसे लढवणार ४४ जागा; उमेदवारांची नावे आली समोर, वाचा यादी

Thursday Horoscope: विद्यार्थ्यांसाठी सुगीचे दिवस; उद्योग धंद्यातही वाढ, वर्षाचा पहिला दिवस या ४ राशींसाठी ठरणार खास

Nostradamus 2026 Predictions : २०२६ मध्ये घडणार भयंकर घडामोडी; नास्त्रेदमसनं काय काय केली भविष्यवाणी?

Bunty Jahagirdar Firing Case: श्रीरामपूर हादरलं! जर्मन बेकरी बॉम्ब स्फोटातील आरोपी बंटी जहागिरदारची हत्या; हल्ल्याचा CCTV व्हिडिओ Viral

SCROLL FOR NEXT