Pimpri Chinchwad News Saam tv
महाराष्ट्र

Crime News : लिफ्ट देत चाकूचा धाक दाखवून महिलांच्या अंगावरील दागिने लुटले; आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Pimpri Chinchwad News : ज्येष्ठ महिलांना कार मध्ये लिफ्ट देण्याच्या बहाणा करून बसविले; यानंतर त्यांना काही अंतरापर्यंत नेट गाडीतच चाकूचा धाक दाखवून अंगावरील सोन्याचे दागिने लुटण्यात आले होते

गोपाळ मोटघरे

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरात ज्येष्ठ महिलांना गाडीत लिफ्ट देऊन रस्त्यात चाकूचा दाखवत अंगावरील सोन्याचे दागिने लुटण्यात आले होते. सदरची घटना काही दिवसांपूर्वी घडली असताना पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरु होता. अखेर आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश मिळाले असून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

पिंपरी चिंचवड शहरातील वाकड येथील भुजबळ चौक या ठिकाणी दोन ज्येष्ठ नागरिक महिला मुंबईकडे जाण्यासाठी थांबल्या होत्या. त्यावेळी तीन आरोपींनी दोन्ही महिलांना कार मध्ये मुंबईत सोडतो; असे सांगून दोन्ही ज्येष्ठ नागरिक महिलांना आपल्या कारमध्ये बसवले. त्यानंतर त्यांनी दोन्ही महिलांना मुंबईकडे न नेता वाकड ब्रीज ते नवीन कात्रज बोगद्या अस फिरवून आणले. याच दरम्यान त्यांनी महिलांना धमकावले. 

चाकूचा धाक दाखवत साडेआठ लाखांचे दागिने लुटले 

गाडीत बसविलेल्या महिलांना धावत्या कारमध्ये चाकूचा धाक दाखवून त्यांच्या जवळील सोन्याची, चैन बांगड्या, अंगठी असा एकूण ८ लाख ४७ हजार किंमतीचा मुद्देमाल आरोपींनी लुटला होता. या प्रकरणात दोन्ही महिलांनी दिलेल्या तक्रारीवरून हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरवात करत तपास सुरु केला होता. 

दोघांना घेतले ताब्यात 

दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा क्रमांक चार पोलीस पथकाने केलेल्या तपासात आबासाहेब अंकुश मदने (वय ३५) आणि कैलास पांडुरंग टोणपे (वय ३२) या दोन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यातील आबासाहेब अंकुश मदने या आरोपीवर यापूर्वी देखील बारामती पोलीस स्टेशनमध्ये गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gauri Palve : पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जेला अटक; डॉ गौरी पालवेची आत्महत्या की हत्या?

TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; मुख्य सूत्रधारासह १८ जणांना बेड्या, राज्यभरात रॅकेट?

Fact Check : आता पाईपलाईननं दारू मिळणार? सरकारकडे अर्ज केल्यानंतर कनेक्शन?

Smriti Mandhana: स्मृती मानधना-पलाशचं लग्न का पुढे ढकललं? कधी होणार लगीन? मुच्छलच्या बहिणीचा मोठा खुलासा

बिबट्या आला रे...! आधी गावात दहशत, आता पुणे शहरात एन्ट्री, VIDEO

SCROLL FOR NEXT