Pimpri Chinchwad News Saam tv
महाराष्ट्र

Crime News : शिक्षकी पेशाला काळिमा; वर्गातील विद्यार्थिनीचा केला लैंगिक छळ, पिंपरी चिंचवड महापालिका शाळेतील धक्कादायक प्रकार

Pimpri Chinchwad News : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेतील वर्ग शिक्षकाने स्वतःच्या वर्गातील अल्पवयीन विद्यार्थी सोबत वारंवार अश्लील गैरवर्तन करून तिचा छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे

गोपाळ मोटघरे

पिंपरी चिंचवड : पिंपरी- चिंचवड शहरात गुरू आणि शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. महापालिका शाळेतील एका शिक्षकाने वर्गातील अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन करत लैंगिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सदर शिक्षकाविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत. 

राज्यात आजही मुली व महिलांवरील अत्याचार, छळाच्या घटना थांबत नाहीत. रोज कुठे ना कुठे छळ- अत्याचाराच्या घटना घडत आहेत. अशात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेतील वर्ग शिक्षकाने स्वतःच्या वर्गातील अल्पवयीन विद्यार्थी सोबत वारंवार अश्लील गैरवर्तन करून तिचा छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे संतप्त भावना व्यक्त केल्या जात असून शिक्षकावर कारवाईची मागणी केली जात आहे. 

गुन्हा दाखल होताच शिक्षकाला घेतले ताब्यात 

दरम्यान ११ जुलै ते १९ जुलै २०२५ या कालावधीत ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात पालकाच्या तक्रारीवरून निगडी पोलीस स्टेशन येथे शिक्षक संतोष हरिभाऊ बेंद्रे (वय ५१) या नराधम शिक्षका विरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलिसांनी संतोष हरिभाऊ बेंद्रे या शिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत.

अघोरी कृत्य करणारा भोंदू जेरबंद
पंढरपूर : अघोरी कृत्याने भक्तांना आकर्षित करणाऱ्या माढा तालुक्यातील अरण येथील एका अघोरी बाबाला पोलिसांनी अटक केली आहे. राहुल रामचंद्र शिंदे (वय ३१) असे या अघोरी बाबाचे नाव आहे. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो पूजा हवनच्या नावाखाली भक्तांची दिशाभूल करत होता. त्याच्या ताब्यातून काळे तीळ, काळ्या बाहुल्या असे साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी माढा न्यायालयाने त्यास उद्या पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

४० मिनिटं विकेटकिपिंग, १ तास फलंदाजी; एमएस धोनी आयपीएलमध्ये कमबॅक करणार?

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आठव्या वेतन आयोगाबाबत डेडलाइन वाढली; आजच करा हे काम

Stylish Blouse Designs : साडी, लेहेंगा अन् स्कर्ट; एकाच ब्लाउजचे अनेक लूक्स, पाहा ट्रेंडी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून राष्ट्रवादी आणि भाजपमधील वाद टोकाला

Nashik TCS Case : लैंगिक शोषण अन् अश्लील टोमणे...; नाशिकच्या TCS धर्मांतर प्रकरणात २० तरुणींनी सांगितली आपबीती

SCROLL FOR NEXT