Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News : डंपरची दुचाकीला धडक, तरुणाचा जागीच मृत्यू; नियमबाह्य वेळेत शहरातून धावताय डंपर

Pimpri Chinchwad News : पिंपरी चिंचवड वाहतूक विभागाने वाहतुकीसाठी एक मर्यादित वेळ आखून दिली आहे, तरी देखील नियमबाह्य वेळेत अवजड ट्रक व डंपर मोठ्या प्रमाणात वापरत असतात. यातून अपघात होत असल्याचे बोलले जात आहे

गोपाळ मोटघरे

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरात वाहतूक विभागाने अवजड वाहनांसाठी विशिष्ट वेळ आखून दिली आहे. मात्र कोणत्याही वेळी हे डंपर शहरातून धावत आहेत. अशात आज पुन्हा एकदा डंपरखाली चिरडून एका दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. काही वेळापूर्वी किवळे परिसरातील साई द्वारका बिल्डिंग समोर ही दुर्दैवी घटना घडली आहे.

पिंपरी चिंचवड शहरात यापूर्वी देखील डंपर ट्रक आणि आरएमसी ट्रक खाली चिरडून कित्येक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमावावा लागला आहे. डंपर ट्रक चालक आणि आरएमसी ट्रक चालकांना पिंपरी चिंचवड वाहतूक विभागाने वाहतुकीसाठी एक मर्यादित वेळ आखून दिली आहे, तरी देखील नियमबाह्य वेळेत अवजड ट्रक व डंपर मोठ्या प्रमाणात वापरत असतात. यातून अपघात होत असल्याचे बोलले जात आहे.

पिंपरी चिंचवडच्या देहू रोड पोलीस स्टेशन कडून डी मार्टकडे सर्विस रोडने जाणाऱ्या एका तरुणाला डंपर ट्रक चालकाने त्याच्या वाहनाच्या चाकाखाली चिरडले आहे. हा अपघात एवढा भीषण होता की या अपघातात तरुणाचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच अपघातानंतर मार्गावरील वाहतूक देखील खोळंबली होती. घटनेची माहिती मिळताच देहू रोड पोलीस दाखल झाले. यानंतर पंचनामा करत मृतदेह रुग्णालयात नेण्यात आला. 

डंपर चालकाला घेतले ताब्यात 

दरम्यान अपघाताला कारणीभूत ठरलेल्या डंपर ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. तसेच नियमबाह्य चालणाऱ्या डंपर, ट्रक चालकाने आज एका पुन्हा निष्पाप तरुणाचा बळी घेतला आहे. शहरात नियमबाह्य वेळेत चालणाऱ्या डंपर ट्रक आणि आरएमसी ट्रक चालकांवर पिंपरी चिंचवड शहर वाहतूक पोलिसांनी कठोर कायदेशीर कारवाई करावी; अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : जोडीदाराबरोबर दिलजमाई करावी लागेल; 5 राशींच्या लोकांना जपून पावले उचलावी लागणार

Maharashtra Politics: शिंदेसेनेचा नगराध्यक्ष भाजपनं पळवला, दिल्लीवारीनंतरही शिंदेंची कोंडी सुरुच

शिर्डीत झाडावर अवतरले साई? साईंच्या दर्शनासाठी उसळली गर्दी

स्मृती मंधाना-पलाशचं लग्न कुणामुळं पुढं ढकललं? संगीत सोहळ्याच्या रात्री काय घडलं? नवरदेवाच्या आईनं खरं कारण सांगितलं

Car Accident: भरधाव कारवरचा कंट्रोल सुटला, भीषण अपघातात IAS अधिकाऱ्यासह तिघांचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT