Swine Flu, african swine flu, buldhana Saam tv
महाराष्ट्र

African Swine Flu ने हजाराे डुकरांचा मृत्यू, नागरिकांना बुलढाणा पालिकेने केले 'हे' आवाहन

ऑफ्रिकन स्वाईन फ्लू पासून मानवी आरोग्याला कुठलाही धोका नाही असे पालिकेने कळविले आहे.

संजय जाधव

Buldhana News : ऑफ्रिकन स्वाईन फ्लूने बुलढाण्यात हजारो डुकरांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. परिणामी बुलढाणा शहरातील डुकरांचा नायनाट करण्याचे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते (bhagyashree vispute) यांनी प्रशासनास दिले आहेत. (Maharashtra News)

बुलढाणा शहरात गेल्या महिन्याभरापासून हजारो डुकरांचा अचानक मृत्यू होत आहे. याबाबतीत संशय आल्याने नगरपालिकेच्या वतीने मेलेल्या डुकरांच्या अवयवाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यानंतर या सर्व डुकरांचा मृत्यू ऑफ्रिकन स्वाईन फ्लू या रोगामुळे झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

हा संसर्ग रोखण्यासाठी शहरातील सर्व डुकरांचा नायनाट करण्याचे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी दिले आहेत. त्यानूसार नगरपालिकेने आता या सर्व डुकरांचा नायनाट करण्यासाठी दहा लोकांचे पथक तयार केले आहे.

नागरिकांनी घाबरु नये

शहरातील सर्व डुकरांचा नायनाट करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ऑफ्रिकन स्वाईन फ्लू पासून मानवी आरोग्याला कुठलाही धोका नसून नागरिकांनी (citizens) घाबरण्याची गरज नाही, असे आवाहन देखील नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश पांडे (ganesh pande) यांनी केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ...

Badnapur News : नागरी सुविधा नसल्याने ग्रामस्थ संतप्त; सरपंचासह ग्रामसेवकाला कोंडले ग्रामपंचायत कार्यालयात

Crime: अनैतिक संबंधात अडसर, बायकोने बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याला संपवलं; नागपुरमध्ये खळबळ

Beed : ...नाहीतर तुझी बायकोला घरी पाठव, बीडमध्ये व्यापार्‍याने केली आत्महत्या, भाजप नेत्याला अटक

Blue Number Plate: कोणत्या गाड्यांना निळ्या नंबर प्लेट दिल्या जातात आणि का? वाचा त्यामागील खास कारणे

SCROLL FOR NEXT