Petrol Diesel Prices Saam Tv
महाराष्ट्र

कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ; पेट्रोल-डिझेल पुन्हा महागणार? पाहा आजचे दर

Petrol Diesel Prices : सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

नवी दिल्ली : एकीकडे केंद्र सरकार पाठोपाठ राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलवरील (Petrol Diesel Prices) टॅक्स कमी करुन सर्वसामान्य जनतेला दिलासा दिला. तर दुसरीकडे कच्चा तेलाच्या (Crude Oil Prices) किंमतीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने पेट्रोलियम कंपन्यांवर भाववाढीचा दबाव आला आहे. सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. बुधवारी पेट्रोलियम कंपन्यांनी तेलाच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही. (Petrol Diesel Latest Prices)

शनिवारी सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याची घोषणा केली होती. यानंतर पेट्रोलच्या दरात कमाल 9 रुपयांनी तर डिझेलच्या दरात 7 रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे इंधनदरवाढीची झळ बसलेल्या सर्वसामान्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र असं असलं तरी, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचा भाव 114 डॉलरवर गेला आहे. जाणकारांनी या आधी जर जर कच्च्या तेलाचा भाव 110 डॉलरहून वर गेल्यास पेट्रोल-डिझेल दर पुन्हा वाढू शकतो असं म्हटलं होतं.

दरम्यान, भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी 6 एप्रिलनंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतीही वाढ केलेली नाही. याअगोदर पेट्रोलियम कंपन्यांकडून 23 मार्चपासून ते एप्रिलच्या पहिल्या आठवड्यादरम्यान, 14 वेळा दरवाढ करण्यात आली होती. या काळात इंधन दरात प्रति लीटर 10.20 रुपये इतकी वाढ झाली होती.

4 प्रमुख महानगरात पेट्रोल-डिझेल दर

– मुंबईमध्ये पेट्रोल 109.27 रुपये आणि डिझेल 95.84 रुपये प्रति लीटर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लीटर

– कोलकत्ता शहरात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लीटर

– चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लीटर

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

करिना- ऐश्वर्याशी तुलना, बेदीच्या मुलीने मार्केट खाल्लं, फोटो झाले तुफान व्हायरल

Beed : दिवाळीत गोरगरिबांना किडे, बुरशीयुक्त तांदूळाचे वाटप; बीड तालुक्यातील संतापजनक प्रकार

Pune Shaniwar Wada : पुण्यातील शनिवारवाड्यात नमाज पठण? Video

आंघोळ कधी वापरतात माहितीये का? तुम्हीही चुकीचा शब्द वापरताय

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा, प्रवाशांना मोठा मनस्ताप|VIDEO

SCROLL FOR NEXT