'डी कंपनी'बाबत ईडीच्या हाती महत्वाची माहिती; दाऊदच्या मुसक्या आवळणार?

नुकतीच मनीलाॅड्रींग प्रकरणात साक्षीदार असलेल्या खालिद उस्मान शेख यांच्या चौकशीतून ही बाब समोर आली आहे.
Dawood Ibrahim
Dawood IbrahimSaam Tv
Published On

मुंबई - कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या 'डी कंपनी'बाबत ईडीच्या हाती काही महत्वाची माहिती लागली आहे. यात दाऊद हा भारतातील त्याचा भाऊ इक्बाल कासकरसह अन्य नातेवाईक आणि भारतातले 'डी कंपनी'तील दाऊदचे (Dawood Ibrahim) खास हस्तकांना महिन्याला लाखो रुपये पाठवले जात असल्याची माहिती समोर आली आहे.

नुकतीच मनीलाॅड्रींग प्रकरणात साक्षीदार असलेल्या खालिद उस्मान शेख यांच्या चौकशीतून ही बाब समोर आली आहे. खालिद हा इक्बाल कासकरचा लहानपनीचा जवळचा मित्र असलेल्या अब्दुल सदमचा लहान भाऊ आहे. ७ डिसेंबर रोजी अब्दुलची गवळी टोळीकडून हत्या करण्यात आली होती. यावेळी इक्बाल कासकर हा दुबईत होता.

हे देखील पाहा -

अब्दुलच्या हत्येची महिती मिळताच इक्बाल हा मुंबई येऊन अब्दुलच्या घरी त्याच्या कुटुंबियांचे सांत्वन करायला गेलेला. त्यानंतर ज्या ज्यावेळी इक्बाल अब्दुलचे भाऊ खालिद आणि त्याचा लहान भाऊ शब्बीर याला बोलवायचा हे दोघंही त्याला भेटायला जायचे.

अशाच एका भेटीत इक्बालने दाऊदकडून दर महिन्याला जवळच्या नातेवाईंकांना व हस्तकांना दाऊद १० लाख पाठवत असल्याचे इक्बालने सांगितल्याचा खुलासा खालिदने ईडीच्या चौकशीत केला आहे. अशाच प्रकारे डी कंपनी भारतातील हस्तकांना पैसे पुरवत असल्याची माहिती नुकतीच NIA च्या एका कारवाईतूनही समोर आली होती.

Dawood Ibrahim
उल्हासनगरात गावगुंडांनी दोन दुचाकी पेटवल्या; दोघांना बेड्या

NIA ने अटक केलेल्या आरीफ शेख आणि शब्बीर शेख या दोघांची कस्टडी मागताना, यातील आरीफ शेख याच्या घरातून ५ लाखाची रोकड NIA ने जप्त केली होती. हे पैसे छोटा शकिलने ईद निमित्ताने पाठवल्याचे म्हटले जात होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com