गुजरातमध्ये पेट्रोल १४.३४ रुपयांनी स्वस्त  SaamTVNews
महाराष्ट्र

गुजरातमध्ये पेट्रोल १४.३४ रुपयांनी स्वस्त

नंदुरबार जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील नागरिकांनी गुजरात मधील पेट्रोल पंपाला दिली पसंती

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार : महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या पेट्रोल दरात १४ रुपये ३४ पैसे एवढा फरक असल्याने महाराष्ट्राच्या (Maharashtra) सीमेवरील पेट्रोल पंपावर विक्रीत २० टक्क्यांनी घट झाली आहे. तर गुजरात (Gujrat) राज्यातील पेट्रोल पंपावर पेट्रोलचा दर प्रतिलिटर ९९.८७ रुपये दर असल्याने नंदुरबार जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील नवापूर, तळोदा, अक्कलकुवा, नंदुरबार येथील वाहनचालक गुजरात मधील पेट्रोल खरेदीला पसंती देतात.

हे देखील पहा :

महाराष्ट्रातील नागरिकांनी गुजरात राज्यातील पेट्रोल (Petrol) विकत घेण्यास पसंती दिली आहे. याचा फटका महाराष्ट्राच्या सीमेवरील पेट्रोलपंप मालकांना बसत आहे. जवळच्या गुजरात राज्यात पेट्रोल १४.३४ रुपये स्वस्त मिळत आहे. महाराष्ट्रात पेट्रोलवर २६ टक्के तर गुजरात राज्यातील पेट्रोल वर १७ टक्के व्हॅट घेतला जातो. त्यामुळे महाराष्ट्रापेक्षा गुजरात राज्यात पेट्रोल डिझेलचे (Diesel) दर नेहमी १० ते १२ रुपये कमी असतात. याचा फायदा नंदुरबार जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील नागरिक घेतात.

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात पेट्रोल दर ११३.२८ रुपये प्रतिलिटर आहे. तर डिझेल ९७.४१ रुपये प्रति लिटर आहे. गुजरातमध्ये पेट्रोल ९९.८७ रुपये प्रतिलिटर तर, डिझेल जवळपास ९४ रुपये प्रति लिटर आहे. डिझेलच्या दरात देखील महाराष्ट्रापेक्षा गुजरात राज्यात चार ते पाच रुपये स्वस्त डिझेल आहे. गुजरात राज्यातील स्वस्त डिझेल आणि पेट्रोल दर फरकामुळे डिझेल पेक्षा पेट्रोल भरण्यावर दुचाकीस्वार व चारचाकी वाहन चालक पसंती देताना दिसून येत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धक्कादायक! रेड लाइट एरियात १२ वर्षीय मुलीला विकण्याचा प्रयत्न, आरोपीला स्थानिकांनी पकडून चोपलं

राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप; ठाकरेंच्या आमदाराच्या निवडणूक प्रचारात CM फडणवीसांचा फोटो|VIDEO

'माझे लग्न लावून द्या' अविवाहित तरूणाचं भाजप आमदाराला पत्र; ४३ व्या वर्षीही पठ्ठ्या सिंगल

Maharashtra Live News Update : जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे फर्निचर दुकानासह लॉजला लागली आग

Budget Tour: काय सांगता? इथे 1 रुपयाची किंमत तब्बल 300 रुपये... खिशात फक्त 1000 रुपये ठेवा अन् परदेश फिरा

SCROLL FOR NEXT