Petrol Crisis Saam Tv
महाराष्ट्र

Petrol Crisis: राज्यात पेट्रोलचा काळाबाजार! किराणा दुकानात पेट्रोलची सर्रास विक्री, 'साम'च्या स्टिंग ऑपरेशनमध्ये पर्दाफाश

Maharashtra Fuel Black Market: महाराष्ट्रात पेट्रोलचा काळाबाजार सुरू आहे. किराणा दुकानात पेट्रोलची सर्रास विक्री केली जात असल्याची बाब समोर आली आहे.

Priya More
  • बीड जिल्ह्यात किराणा दुकाने आणि पानटपऱ्यांमधून पेट्रोलची बेकायदा विक्री

  • साम टीव्हीच्या स्टिंग ऑपरेशनमधून धक्कादायक वास्तव समोर

  • पेट्रोल 130 ते 135 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे

  • पुरवठा विभाग आणि पोलिसांना याबाबत माहिती नसल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला

सुप्रिम मसकर, साम टीव्ही

आता बातमी आहे साम टीव्हीनं केलेल्या स्टिंग ऑपरेशनची. पेट्रोल टंचाईचा फायदा उचलून आता किराणा दुकान आणि पान टपऱ्यांमधून पेट्रोलचा सर्रास काळाबाजार सुरू आहे. चढ्या दरानं सुरू असलेल्या या पेट्रोल विक्रीचं साम टीव्हीनं स्टिंग ऑपरेशन केलंय. नेमका कुठे आणि कसा सुरूय हा काळाबाजार ? पाहूयात त्यावरचा इन्व्हस्टीगेशन रिपोर्ट...

राज्यात एकीकडे इंधन टंचाईचं मोठं संकट घोंगावत असताना, दुसरीकडे याच टंचाईचा गैरफायदा घेत मराठवाड्यात पेट्रोल आणि डिझेलचा काळाबाजार सुरू झालाय.. थेट पानटपऱ्या आणि किराणा दुकानांमध्ये चक्क 130 ते 135 रुपये प्रति लिटर दरानं पेट्रोल विकलं जातंय. बीड जिल्ह्यातल्या अशाच काळाबाजाराचा 'साम टीव्ही'च्या स्टिंग ऑपरेशनमध्ये पर्दाफाश झालाय. या स्टिंगमधून काय समोर आलंय पाहूयात.

सर्वसामान्यांच्या खिशातून चक्क 17 ते 22 रुपये अधिकचे ओरबाडले जात असताना दुसरीकडे या गोरखधंद्यांची पोलीस आणि पुरवठा विभागाला याचा साधा सुगावाही नाही. असा प्रकार आमच्या निदर्शनास आला नाही, असं सांगून कारवाईचं मोघम उत्तर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिलयं.

पुरवठा विभागाने आता कारवाईचं आश्वासन दिलं असलं, तरी साम टीव्हीच्या स्टिंग ऑपरेशननं प्रशासनाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आणलाय. ज्वलनशील पदार्थाचा असा छुप्या पद्धतीने साठा करणं म्हणजे एका मोठ्या अपघाताला निमंत्रण देण्यासारखं आहे. मात्र पैशांच्या हव्यासापोटी नियमांची सर्रास पायमल्ली होतेय.

मात्र पेट्रोल पंपांवर तुटवडा असताना काळ्या बाजारात इंधन पोहचतच कसं? याची पाळंमुळं शोधायला हवीत..हा प्रकार फक्त एका गावापुरता मर्यादीत नाही. तर इंधनाचा हा गोरखधंदा राज्यभरात सुरू आहे. याआधी धाराशिवमधील पेट्रोलचा काळाबाजर सामनं उघड केला होता. त्यामुळे बीडमधील साम टीव्हीच्या या स्टिंग ऑपरेशननंतर पुरवठा विभाग या बेकायदा पेट्रोल विक्रेत्यांवर कारवाई करणार का हा खरा प्रश्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना केंद्रीय मंत्र्यांची खुली ऑफर, राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या

Ambenali Ghat Closed: आंबेनळी घाट ४ दिवस वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद, पर्यायी मार्ग कोणते? VIDEO

Saturday Horoscope : नवी संधी मिळणार; ५ राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: रत्नागिरी - खेड शहराच्या मटण मार्केट परिसरात शिरलं जगबुडी नदीच्या पुराचं पाणी

Prajakta Mali Farmhouse: निसर्गाच्या सान्निध्यातील प्राजक्ता माळीचं आलिशान फार्महाऊस; जाणून घ्या एका दिवसाचं भाडं

SCROLL FOR NEXT