Police Investigation Nashik Saam Tv
महाराष्ट्र

पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या महिलेवर भरदिवसा कोयत्याने वार, घटना CCTV मध्ये कैद

नाशिकच्या पाथर्डी गावाजवळ एका धक्कादायक घटनेमुळं खळबळ उडाली आहे.

साम टिव्ही ब्युरो

नाशिक : पाथर्डी गावाजवळ एका धक्कादायक घटनेमुळं खळबळ उडाली आहे. पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या एका महिलेवर भरदिवसा (sickle attack on woman) कोयत्याने वार केल्याची घटना घडलीय. जुबेदा खान असं जखमी झालेल्या महिलेचं नाव आहे. या हल्ल्यात जुबेदा गंभीर जखमी झाली असून तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. प्रमोद गोसावी असे संशयित आरोपीचे नाव आहे. या संपूर्ण घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलीस (Police) याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या पाथर्डी गाव -वडनेर रोड येथील जाधव पेट्रोलियम पंपावर काम करणाऱ्या महिलेवर एका इसमाने धारदार शस्त्राने वार केले. भरदिवसा घडलेल्या या थरारक घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील वाहतूक मार्गात मोठे बदल, पर्यायी मार्ग कोणते?

Jolly LLB 3 BO Collection: अक्षय कुमारचा चित्रपट ब्लॉकबस्टर ओपनिंगसाठी सज्ज; 'जॉली एलएलबी 3' करणार का रेकॉर्ड ब्रेक कमाई?

Maharashtra Government: अतिवृष्टीनं शेतकरी कोमात, मंत्री- अधिकारी जोमात; मंत्र्याच्या दिमतीला ३० लाख रुपयांच्या आलिशान गाड्या

Maharashtra Live News Update: पुणे महापालिकेच्या हद्दीत नोंद न झालेल्या मिळकतींवर करआकारणीचा धडाका

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना E-KYC अनिवार्य, कुठे अन् कसं करायचं? स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या

SCROLL FOR NEXT