अखेर वारकऱ्यांची प्रतिक्षा संपली; कार्तिकी वारीला परवानगी SaamTV
महाराष्ट्र

अखेर वारकऱ्यांची प्रतिक्षा संपली; कार्तिकी वारीला परवानगी

अनेक दिवसांपासून ज्या निर्णयाची वाट संपुर्ण महाराष्ट्रातील वारकरी पाहात होते तो निर्णय अखेर राज्य सरकारने घेतला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - अनेक दिवसांपासून ज्या निर्णयाची वाट संपुर्ण महाराष्ट्रातील वारकरी Warkari पाहात होते तो निर्णय अखेर राज्य सरकारने घेतला असून आता सर्व वारकऱ्यांना आपल्या लाडक्या विठूरायाच्या दर्शनासाठी चालत कार्तिकी वारीला Karthiki Wari जाण्याची परवानगी मिळाली आहे.

हे देखील पहा -

कोरोना निर्बंध Corona restrictions शिथिल झाल्यानंतर पहिल्यांदाच कार्तिकी वारी 15 नोव्हेंबरला होणार आहे. दरम्यान या वारीला मोठी गर्दी अपेक्षित असल्यानं जिल्हा प्रशासनानंसह आपत्ती व्यवस्थापन तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाकडे परवानगीसाठी प्रस्ताव पाठवण्याची तयारी सुरू केली आहे. तसेच राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्यामुळे कार्तिकी वारीसाठी स्वतंत्र परवानगीची आवश्यकता नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सांगितलं आहे.

17 एप्रिल 2020 पासून वारकऱ्यांना एकाही वारीला जाण्याची परवानगी मिळाली नव्हती मात्र आता आपल्या लाडक्या विठूरायाच्या दर्शनासाठी जाण्याची संधी मिळणार असल्यानं सर्व वारकऱ्यांमध्ये आनंदाच वातावरण आहे.

आषाढी, कार्तिकी, चैत्र, माघ या चार वारींच्या निमित्ताने लाखो वारकरी पंढरीत दाखल होतात. मात्र मागील काही काळापासून कोरोनाच्या पार्श्वभूनीवरती पायी वारी सोबत चालत जाण्यासाठी सरकारने बंधने घातली होती.तसेच कोरोनाच्या दोन लाटेंमध्ये आषाढी वारीला मानाच्या पालख्या ST बसेसमधून पंढरीत दाखल झाल्या होत्या. त्यावेळी ठराविक वारकरीच वारीत सहभागी झाले होते.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीची आत्महत्या की हत्या? लग्नाच्या 10 महिन्यात नेमकं काय घडलं?

Accident: मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; कारच्या पुढील भागाचा चुरा, २ जणांचा जागीच मृत्यू

Local Body Election : स्थानिक निवडणुकीत आता 'साडी पॅटर्न'; अवघ्या महिलांची 40 रुपयावर मतदारांची बोळवण, VIDEO

Smriti Mandhana: स्मृती मानधनाच्या लग्नात विघ्न; वडिलांच्या पाठोपाठ होणाऱ्या नवऱ्याची प्रकृती बिघडली

BMC Election : महापालिकेची ही शेवटची निवडणूक, हातातून मुंबई गेली तर...; राज ठाकरे स्पष्टच बोलले, VIDEO

SCROLL FOR NEXT