MPSC Saam Tv
महाराष्ट्र

MPSC: एमपीएससीमार्फत आता शिपाई पदांची भरती होणार; GR जारी, अंमलबजावणी केव्हापासून होणार? वाचा सविस्तर

Peon Post Will Recruit Through MPSC: महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससीमार्फत आता शिपाई पदे भरती केली जाणार आहे. २०२६ पासून याबाबत अंमलबजावणी केली जाणार आहे.

Siddhi Hande

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत म्हणजेच एमपीएससीद्वारे आता शिपाई पदे भरली जाणार आहे.याबाबत जीआर जारी करण्यात आला आहे. २०२६ पासून यावर अंमलबजावणी केली जाणार आहे.

सरळसेवा भरतीमधील गैरप्रकार रोखण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत हा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी सामान्य प्रशासनाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती गठीत केली आहे. मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी एमपीएसी कक्षेत जी पदे भरती करायची आहेत त्याचा प्रस्ताव समितीकडे सादर करायचा आहे. यानंतर प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार, समिती जी पदे प्रधान्याने एमपीएसीकडे वर्ग करायची आहेत, त्याबाबत समिती शिफारस करणार आहे.

ज्या विभागांना पदभरती परीक्षा घेण्यासाठी टीसीएस, आयबीपीएस, आयओएन या कंपन्यासोबत केला आहे. त्या विभागातील भरती प्रक्रिया ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होईल. त्यानंतरच एमपीएससीमार्फत शिपाई पदांसाठी पदभरती केली जाणार आहे. म्हणजेच २०२६ नंतर या पदांसाठी भरती केली जाणार आहे. २०२६ नंतर सर्व शासकीय कार्यालयातील गट ब आणि गट क संवर्गातील पदे भरती करण्यात येणार आहेत.

सरकारच्या विविध विभागातील वर्ग दोन आणि तीनची पदे ही 'महापरीक्षा पोर्टल'द्वारे भरती केली जात होती. मात्र, तोतया उमेदवार आणि गुणांमध्ये फेरबदल केल्याच्या प्रकारांमुळे पोर्टल बंद करुन महाआयटी कंपन्यांतर्फे इतर कंपन्याना ही कामे दिला गेली होती. त्यालाही विरोध होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता २०२६ नंतर शासकीय विभागात शिपाई पदे एमपीएससीद्वारे भरती केली जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलाच! ३ दहशतवाद्यांना धाडलं यमसदनी, अमित शहांनी संसदेत काय-काय सांगितलं?

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

Monsoon Sweating : पावसाळ्यात जास्त घाम का येतो? यावर उपाय काय?

When to do heart checkup: भारतातील 30% मृत्यू हार्ट अटॅकमुळेच! धोका टाळण्यासाठी कोणत्या टेस्ट करणं गरजेचं आणि कधी?

Vice President Election : उपराष्ट्रपतींची निवडणूक कशी होते? नेमकी प्रक्रिया काय असते? जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT