Yugendra Pawar Someshwar Sugar Factory election latest news saam tv
महाराष्ट्र

बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार; सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत युगेंद्र पवारांची एंट्री

Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक जाहीर करण्यात आलाय. युगेंद्र पवारांनी पॅनेल उभं करून निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखालील गटासमोर नव्या राजकीय आव्हानाची चर्चा सुरू झाली आहे.

Bharat Jadhav

बारामतीच्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झालीय. यात पुन्हा एकदा पवारविरुद्ध पवार असी लढत होणार आहे. कारम या निवडणुकीत युवा नेते युगेंद्र पवार यांनी एन्ट्री केलीय. युगेंद्र पवार यांनी स्वतंत्र शेतकरी पॅनल उभे करून निवडणूक रिंगणात उतरण्याचे स्पष्ट संकेत दिलेत. यामुळे सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखालील पॅनेलसमोर युगेंद्र पवार यांच्या पॅनेलचे आव्हान असणार आहे.

निवडणुकीबाबत काय म्हणाले युगेंद्र पवार?

आम्हाला पवारविरुद्ध पवार असे करण्यात रस नाहीये आणि तसे होऊ नये असेच आम्हाला वाटते. कुणाच्या विरोधात न लढता शेतकरी सभासदांसाठी सक्षम पर्याय उभा राहावा, म्हणून आम्ही लढतोय. सुनेत्रा काकींबद्दल आमचा आक्षेप नाही परंतु सोमेश्वरच्या संचालकांबद्दल आमचा आक्षेप आहे. अनेक वर्षांपासून एकाच कुटुंबात सत्ता आहे. त्यामुळे यंदा बदल गरजेचा आहे. संविधानिक मार्गाने बदल घडवू, असे म्हणत निवडणूक होणारच, असे स्पष्ट संकेत युगेंद्र पवार यांनी दिलेत.

कारखान्यावर पवारसाहेबांचं लक्ष असावं अशी सभासदांचीच इच्छा

ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे लक्ष सोमेश्वर साखर कारखान्यावर असावे, अशी सभासदांची इच्छा आहे. पवार विरुद्ध पवार असा प्रचार करण्यापेक्षा 'पवार विथ पवार' असेही होऊ शकते, असेही युगेंद्र पवार म्हणालेत. ऊसाला चांगला दर मिळाला पाहिजे, साखरेचा दर्जा सुधारला पाहिजे, शेड्यूलप्रमाणे ऊस तुटला पाहिजे, कामगार भरती मेरिटवर झाली पाहिजे, कारखान्याचा पारदर्शक कारभार झाला पाहिजे, अशा मागण्या घेऊन आम्ही सभासदांसमोर जाणार असल्याचं युगेंद्र पवार म्हणालेत.

दुसरीकडे राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी दोन दिवसांपूर्वीच शेतकरी मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी सोमेश्वरची निवडणूक बिनविरोध करा, असं आवाहन सभासदांना केलं होतं. अजित पवार यांच्या विचारांनीच सोमेश्वरची निवडणूक होईल, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या होत्या. दरम्यान सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक ११ ऑक्टोबरला मतदान होईल तर १२ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. सोमेश्वर साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र १५० गावांचे असून बारामती, पुरंदर, खंडाळा, फलटण तालुक्यात सभासद असल्याने या निवडणुकीला शेतकरी वर्गात विशेष महत्त्व आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT