Private Bus Fare 
महाराष्ट्र

Private Bus Fare: खासगी बस चालकांकडून प्रवाशांची लूट, ऐन गणेशोत्सवात चाकरमान्यांना फटका

Private Bus Fare: गणेशोत्सवाच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय. त्यामुळे प्रवाशांना खासगी ट्रॅव्हल्सने प्रवास करावा लागतोय. मात्र या ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून प्रवाशांची लूट सुरूय...याच लुटीवरचा स्पेशल रिपोर्ट.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

ऐन गणेशोत्सवाच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलंय. त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल सुरु आहेत. तर याच संधीचा फायदा घेत खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनीही आपलं उखळ पांढरं करून घ्यायला सुरुवात केलीय. खासगी बसचालक आणि मालक प्रवाशांकडून दुप्पट दर आकारत असल्याचा आरोप प्रवाशांनी केलाय. त्यांमुळे सामन टीव्हीनं याचं रियालिटी चेक केल्यानंतर या लुटीचा पर्दाफाश झालाय. नेमकी ही किती लूट सुरू आहे ते पाहूयात.

एसटीचा संप, ट्रॅव्हल्सकडून लूट

वाशी ते महाड एसटीचे दर 300 रुपये

खासगी ट्रॅव्हल्सचे दर 600 ते 800 रुपये

वाशी ते चिपळूण एसटीचे दर 490 रुपये

खासगी ट्रॅव्हल्सचे दर 1200 ते 1500 रुपये

वाशी ते मालवण (शिवशाही)चे दर 1000 रुपये

खासगी ट्रॅव्हल्सचे दर 1200 ते 1500 रुपये

वाशी ते सातारा एसटीचे दर 450 रुपये

खासगी ट्रॅव्हल्सचे दर 1200 ते 1500 रुपये

खासगी ट्रव्हल्स कंपन्या ऐन गणेशोत्सवात अव्वाच्या सव्वा तिकीट दर आकारत असल्यामुळे प्रवासी पुरते बेजार झाले आहेत. एकीकडे कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सामान्यांचे तर हाल होतच आहेत. मात्र एसटीलाही कोट्यावधींचा फटका बसतोय. सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेऊन तोडगा काढाय़ला हवा. तसंच प्रवाशांची लूट करणा-या ट्रॅव्हल्स कंपन्यांवर परिवहन विभागानं कडक कारवाई करायला हवी. कारण एकीकडे सरकारचं नुकसान होतंय आणि दुसरीकडे प्रवाशांचीही लूट सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने चांदीचे दर घसरले

Sleep Secrets: रात्री झोपताना एक पाय बाहेर काढण्याची सवय चांगली की वाईट? तज्ज्ञांनी सांगितली कारणे

धनत्रयोदशीनिमित्त मोठी खुशखबर! १० तोळं सोनं १९,१०० रूपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले

IMD Weather Alert: धनत्रयोदशीला आस्मानी संकट येणार, ४८ तास पाऊस धो धो कोसळणार, IMD कडून गंभीर इशारा

Mumbai Heat News : मुंबईकरांना ऑक्टोबर हिटचा तडाखा, पारा 37 अंशावर | VIDEO

SCROLL FOR NEXT