पंढरपूर आगारातील प्रवासी बस सेवा उद्यापासून सुरू होणार !  Saam Tv
महाराष्ट्र

पंढरपूर आगारातील प्रवासी बस सेवा उद्यापासून सुरू होणार !

आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर (Ashadhi Ekadashi 2021) पंढरपुरातील बंद करण्यात आलेली एसटीची प्रवासी वाहतूक उद्यापासून सुरू करण्यात येणार आहे.

भारत नागणे

पंढरपूर: आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर (Ashadhi Ekadashi 2021) पंढरपुरातील बंद करण्यात आलेली एसटीची प्रवासी वाहतूक उद्यापासून सुरू करण्यात येणार आहे. या दरम्यान पंढरपूर आगारातून बाहेर जाणाऱ्या व येणाऱ्या बस गाड्यांना परवानगी देण्यात आली आहे. यामुळे पंढरपूर आगारातून उद्यापासून 215 गाड्यांच्या फेऱ्या सुरू होणार आहेत.

यावर्षी आषाढी यात्रेचा सोहळा प्रतीकात्मक पद्धतीने साजरा करण्यात आला. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी निर्बंधामध्ये आषाढी यात्रेच्या सोहळ्यास परवानगी दिली होती .यात्रेसाठी बाहेरगावचे लोक येऊ नयेत यासाठी खबरदारी म्हणून प्रशासनाने 18 ते 25 जुलै पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. यादरम्यान एसटीची प्रवासी वाहतूक देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

परंतु आता पंढरपूर आगारातून होणारी एसटीचे प्रवासी वाहतूक उद्यापासून सुरू करण्याचा निर्णय एसटी प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये फक्त पंढरपूर आगाराच्या बस‌ गाड्यांना पंढरपुरात येण्यास व जाण्यास परवानगी दिली आहे. यामुळे प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latur Tourism : विकेंड गेटवे! लातूरमधील किल्ले, मंदिरे आणि निसर्गरम्य ठिकाणं तुमची वाट पाहतायेत, लगेचच द्या भेट

Maharashtra Live Update: मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

Chetana Bhat: असं रुप पाहिलं अन् मन गहिरवरुन आलं...

Viral Video: लखनऊ - बरौनी एक्सप्रेसमध्ये सापडल्या 325 दारूच्या बाटल्या; रेल्वे प्रशासनाची मोठी कारवाई

Dahi Handi Wishes 2025: गोविंदा रे गोपाळा...! 'या' दहीहंडीच्या सणाला नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींना पाठवा खास शुभेच्छा

SCROLL FOR NEXT