Passanger Climbed Train Saam Tv
महाराष्ट्र

Nandgaon News : प्रवासी थेट रेल्वेच्या डब्यावर चढला, नांदगाव स्टेशनवरील घटनेचा थरार, VIDEO

Rohini Gudaghe

साम टीव्ही, नांदगाव

नांदगाव रेल्वे स्थानकातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. एक प्रवासी थेट रेल्वेच्या टपावर चढला होता. त्यामुळे नांदगाव स्टेशनवर मोठा गोंधळ उडाला होता. त्यानंतर त्याने एका गाडीवरून दुसऱ्या गाडीवर उड्या मारायला सुरूवात केली होती. त्याच्या या कृत्यामुळे स्थानकातील इतर प्रवाशांमध्ये मोठं भितीचं वातावरण निर्माण झालं होतं. ही नेमकी घटना काय होती? ते आपण सविस्तर जाणून घेवू या.

रेल्वे स्थानकात नेमकं काय घडलं?

नाशिकच्या नांदगाव रेल्वे कृषीनगर एक्स्प्रेस उभी (Nandgaon News) होती. आज ४ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास एक व्यक्ती या एक्सप्रेसच्या टपावर चढला होता. गाडीवर चढून तो इकडे तिकडे चालू लागला. या गाडीवरून त्याने स्थानकात उभी असलेल्या महानगरी एक्स्प्रेसवर देखील उडी मारली होती. हा व्यक्ती वेडसर असल्याची माहिती समोर आलीय.

प्रवासी थेट रेल्वेच्या टपावर चढला

एका गाडीवरून दुसऱ्या गाडीवर हा व्यक्ती उड्या मारत (Man Climbed Train Video) होता. यावेळी 'ओव्हर हेड वायर 'अगदी जवळच होती. त्याचा थोडाही स्पर्श या वायरला झाला असता तर त्याचा विद्युत करंट लागून मृत्यू झाला असता. मात्र, रेल्वेच्या इलेक्ट्रिक विभागाचे प्रमुख असलेले संदीप पाटील यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ ओव्हर हेड वायरचा विद्युत पुरवठा खंडित केला. त्यामुळे या व्यक्तीचा जीव वाचला.

घटनेचा व्हिडिओ समोर

यावेळी रेल्वे स्थानकावर उपस्थित असलेल्या रेल्वे पोलिसांनी त्याला रेल्वेच्या डब्ब्यावरून खाली (Viral Video) खेचले. या सर्व प्रकारामुळे दोन्ही गाड्यांना मात्र अर्ध्या तासाच्या फरकाने स्थानकाबाहेर पडावे लागले. या माथेफिरूला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलंय. घटनेमुळे रेल्वे स्थानकात काही वेळ गोंधळाचं वातावरण (Nandgaon railway station) होतं. या सर्व घटनेचा व्हिडिओ समोर आलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT