Nandurbar Fire News Saam Tv
महाराष्ट्र

Nandurbar Fire News : नवापूर शहरातील पश्चिम घाट आगीच्या विळख्यात; जंगलात वनवा पेटला

आगीत पश्चिम घाटातील दुर्मीळ वनौषधी,जैवविविधता,वनस्पती धोक्यात...

Shivani Tichkule

सागर निकवाडे

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरातील उत्तर भागात असलेल्या पश्चिम घाटाच्या जंगलात काल रात्रीपासून वनवा पेटत असल्याचे दृश्य नवापूर शहरवासीयांना दिसत होते. धगधगता वनवा पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली.

यासंदर्भात वन्यप्रेमींनी वनविभागाला संपर्क केल्यानंतर वनविभागाला जाग आल्यानंतर घटनास्थळी रात्री नवापूर वनविभागाचे अधिकारी कर्मचारी वनमजूर व परिसरातील ग्रामस्थ आग विझवण्यासाठी जंगलात उपस्थित होते. डोंगराच्या एका बाजूची आग काही तासातच नियंत्रणात आणली परंतु दुसऱ्या बाजूला जामतलावचा परिसरातील जंगलात आग मध्यरात्रीपर्यंत धगधगत होती. (Latest Marathi News)

या आगीमुळे (Fire) पश्चिम घाटातील दुर्मिळ वनौषधी, वनस्पती,जैवविविधता धोक्यात आल्याची परिस्थिती आहे.या संदर्भात वनविभागाने लक्ष देणे गरजेचे आहे आग कशामुळे लागते याचा देखील शोध वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घ्यावा.

पश्चिम घाट हा जगातील आठ जैवविविधता हॉटस्पॉटपैकी एक आहे. पश्चिम घाटाची सुरुवात नवापूर पासून ते थेट कन्याकुमारी पर्यंत आहे. पश्चिम घाटातील या जंगलात काल आग लागली आणि वणवा पसरला.

वन विभाग व ग्रामस्थ सातत्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ही आग विझवण्यासाठी दूर्गम भाग, तीव्र वारे आणि उच्च तापमानामुळे आग विझवण्यात अडथळे निर्माण झाले आहेत. (Nandurbar News)

आगीत कोणत्याही प्रचाराचे नुकसान न झाल्याचा दावा वनविभागाने केला आहे.आगीत फक्त कोरडा चारा व गवत जळत असते असे विधान वनक्षेत्रपाल स्नेहल अवसरमल यांनी केले आहे. जंगलात पुन्हा आग लागू नये यासाठी वनविभागाने नियोजन करणे गरजेचे आहे, अन्यथा मौल्यवान वनस्पती, दुर्मिळ वनौषधी,जैवविविधता नष्ट होईल वनविभागाच्या अधिकाऱ्याने देखील नवापूरच्या जंगलात लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. कशा पद्धतीने कारभार चालतो याचा देखील आढावा घेणे महत्त्वाचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Sunday : कर्कच्या कामाचे कौतुक! धनु राशीच्या इच्छा पूर्ण होणार! पाहा, तुमचे राशिभविष्य

Anant Chaturdashi 2025 live updates : नागपुरातील दक्षिणामूर्ती गणेश मंडळाचा गणपती बडकस चौकात पोहचणार

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

Zakir Khan: 'प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी...' झाकीर खानने केली मोठी घोषणा, स्टेज शोमधून घेणार ब्रेक

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य ठरले विशेष आकर्षण|VIDEO

SCROLL FOR NEXT