Solapur Crime News: नागणसूरच्या महास्वामींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल; नोकरीचे आमिष दाखवून २८ लाख उकळले

Crime News: ही घटना २ एप्रिल २०२२ ते १२ एप्रिल २०२३ दरम्यान घडली.
Mahaswami of Nagansur
Mahaswami of NagansurSaam Tv
Published On

Solapur News : अक्कलकोट तालुक्यातील नागणसूर मधील एका शिक्षण संस्थेचे चेअरमन श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी यांनी एका तरुणाला शाळेत शिक्षकाची नोकरी लावतो,म्हणून २८ लाख उकळून फसवणूक केली. ही घटना २ एप्रिल २०२२ ते १२ एप्रिल २०२३ दरम्यान घडली. याबाबत अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (Latest Marathi News)

Mahaswami of Nagansur
Mumabi Rain News: मुंबईत जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी, अनेक ठिकाणी पाणी साचलं

याबाबत पोलिसांकडे (Police) दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार,आरोपी म्हास्वामी यांनी फिर्यादी शांतवीरप्पा कळसगोंडा यांना शिक्षक राम सोलापुरे यांच्यामार्फत बोलावून घेतले. शाळेत एक शिक्षकाची जागा रिक्त आहे तेथे घेतो म्हणून २८ लाख रुपये एका महिन्यात देण्यास सांगितले.

शेतजमीन विकून रक्कम जमा केली.एका महिन्यानंतर ३१ मे २०२२ पर्यंत त्यांच्याकडून बोलणी केल्याप्रमाणे कॉल लेटर आले नाही, म्हणून भेटून विचारले असता शक्य नाही. मी धर्मसंकटात सापडलो आहे,असे सांगत उडवाउडवीची उत्तरे दिली. मी घेऊ शकत नाही,तुला काय करायचे आहे ते कर,असे बोलून निघून गेल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. (Solapur News)

Mahaswami of Nagansur
Dog Attack on Boy: नागपुरात भटक्या कुत्र्यांचा 3 वर्षीय चिमुकल्यावर हल्ला; थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

आरोपी श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी यांची दक्षिण सोलापूर तालुक्यात होटगी येथे सीता माता ज. शेळके हायस्कूल आहे.या संस्थेत एक शिक्षक पद रिक्त आहे. २८ लाख रुपये दे, अप्रॉलही मीच करून देतो,म्हणून रक्कम घेतली.त्यानंतर नोकरीवर घेतले नाही.

रक्कम परत देण्याचीही तयारी दाखविली नाही.फिर्यादी नोकरीच्या आशेने स्वतःची शेतजमीन विकून रक्कम भरली. याबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे श्रीकंठ म्हास्वामी विरुद्ध अखेर तक्रार नोंदविली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com