Parola News Saam tv
महाराष्ट्र

Parola News : २२ वर्षीय तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू; बारा दिवसांपासून होता बेपत्ता

Jalgaon News : पारोळा तालुक्यातील कन्हेरे येथील अमोल मधुकर पाटील (वय २२) हा १३ जानेवारीला घरी कोणालाच काही न सांगता निघून गेला होता. याआधी देखील तो दोन ते तीन वेळेस असाच घरातून बेपत्ता झाला होता.

साम टिव्ही ब्युरो

पारोळा (जळगाव) : पारोळा तालुक्यातील कन्हेरे येथील २२ वर्षीय तरुण काही दिवसापूर्वी घरातून बेपत्ता होता. (Parola) परंतु त्याच्या कन्हेरे शिवारातील एका विहिरीत पडून मृत्यू (Death) झाल्या असल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. (Maharashtra News)

पारोळा तालुक्यातील कन्हेरे येथील अमोल मधुकर पाटील (वय २२) हा १३ जानेवारीला घरी कोणालाच काही न सांगता निघून गेला होता. याआधी देखील तो दोन ते तीन वेळेस असाच घरातून बेपत्ता झाला होता. परंतु तो प्रत्येक वेळी घरी (Jalgaon) येऊन जात होता. मात्र यावेळेस तो घरी परतलाच नाही. दरम्यान २२ जानेवारीला सव्वा तीन वाजेच्या सुमारास गावातील नामदेव महारु पाटील यांच्या शेतात असलेल्या विहिरीमध्ये त्याचा मृतदेह तरंगलेल्या अवस्थेत मिळून यावेळी गावकऱ्यांनी त्याचा मृतदेह बाहेर काढला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हा मृतदेह कोणाचा याचा तपस केला असता अमोल पाटील याचा मृतदेह असल्याचे समोर आले. याबाबत मनोज भगवान पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून पारोळा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Peer Benefits: थंडीत पेर खल्ल्याने होतात हे आरोग्यदायी फायदे

Monday Horoscope : जुनाट विकार डोके वर काढणार; ५ राशींच्या लोकांना घ्यावी लागेल तब्येतीची काळजी

मुंढवा जमीन प्रकरणात मोठी कारवाई; मुख्य आरोपींमधील आणखी एकाला अटक

Indigo Chaos Hits Maharashtra: इंडिगोचा घोळ, मंत्री-आमदारांना फटका, नागपुरात जाण्यासाठी नेत्यांची धावपळ

Maharashtra Live News Update: माजी खासदार नवनीत राणा यांचं पुन्हा बाबरीची वीट रचणाऱ्यांना ट्विट करून दिले आव्हान

SCROLL FOR NEXT