Parner Crime Saamtv
महाराष्ट्र

Parner Crime: धक्कादायक! भरदिवसा डोक्यात दगड घालून तरुणाची हत्या; पारनेर तालुक्यात खळबळ

Ahmednagar Crime News: पारनेरच्या राळेगणसिद्धी - वाडेगव्हाण रोडवर ही घटना घडली असून अज्ञात व्यक्तीविरुद्ध सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

Gangappa Pujari

सुशिल थोरात, प्रतिनिधी...

Ralegansiddhi Crime: पाळनेर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. पारनेर तालुक्यातील राळेगणसिद्धी - वाडेगव्हाण रोडवर तरुणाची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पारनेरच्या राळेगणसिद्धी - वाडेगव्हाण रोडवर तरुणाची भरदिवसा डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. अंकुश भिमाजी कौठाळे असे मृत व्यक्तीचे नाव असून या भयंकर घटनेने पारनेर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. (Parner News)

या भीषण हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून अज्ञात व्यक्तीविरुद्ध सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतक्या निर्घृणपणे तरुणाची हत्या का केली असावी? प्रेम संबंध की आणखी कोणत्या वादातून ही हत्या झाली, अशा अनेक प्रश्नांची उकल करण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे. (Latest Marathi News)

शिवसेना शाखा प्रमुखाची निर्घृण हत्या...

दरम्यान, उल्हासनगर कॅम्प क्रमांक पाच या भागात रात्री मध्यरात्री एकाची हत्या झाल्याचे समोर आले होते. शब्बीर शेख असं हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते जुगाराचा क्लब चालवत असतं. त्यांना नुकतेच शिंदे गटाचे (cm eknath shinde) शाखाप्रमुख पद देण्यात आले होते. या घटनेत हल्लेखोरांनी चाॅपर, तलवार असे धारदार हत्यारांचा वापर केल्याचे निदर्शनास आले आहे. (Crime News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care: वयाच्या चाळीशीतही तरुण दिसायचं, तर घरच्या घरी करुन लावा ही पेस्ट, आठवड्याभरात दिसेल फरक

Maharashtra Live News Update: गणेश विसर्जन मिरवणुकीत महिला पत्रकाराचा विनयभंग करणारे अखेर अटकेत

Wednesday Horoscope : मेष राशीसाठी संकष्ठीला लाभ, या राशींच्या नव्या संकल्पना यशस्वी होणार

Janhvi Kapoor: नवरी नटली! जान्हवी कपूरचा नवा ब्रायडल लूक पाहिलात का?

CP Radhakrishnan : सी. पी. राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती; 'इतक्या' संपत्तीचे आहेत मालक

SCROLL FOR NEXT