Rescue teams conduct search operation at Chandapur Lake in Parli after a युवक went missing while swimming. saam tv
महाराष्ट्र

Beed News: पोहायला गेला अन् परतलाच नाही! परळीत तरुण बेपत्ता

Youth Missing In Chandapur Lake Parli Beed: परळी तालुक्यातील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी हा तरुण बेपत्ता झाला आहे. नगरपरिषदेचे शोधकार्य सुरू असून डिझास्टर मॅनेजमेंट टीमला पाचारण करण्यात आले आहे.

Omkar Sonawane

योगेश काशीद, साम टीव्ही

बीड: परळी तालुक्यातील चांदापूर येथील तलावामध्ये आज, २३ जून रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी नावाचा व्यक्ती पाण्यात बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच परळी नगरपरिषदेच्या शोध पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरू केले आहे. मात्र, संबंधित व्यक्ती नेमकी कोणत्या ठिकाणी बुडाली तो स्पॉट याचा अचूक अंदाज येत नसल्याने शोधकार्यात अडथळे निर्माण होत असून शोध लागण्यास उशीर होत आहे.

परळीच्या नगराध्यक्षा पद्मश्रीताई धर्माधिकारी यांचे पती आणि नगरसेवक बाजीरावभैया धर्माधिकारी यांनी तत्परता दाखवत घटनास्थळी भेट देऊन नगरपरिषदेच्या टीमला पाठवून दिले. परळी नगरपरिषदेचे शोध पथक सकाळपासून पाण्यात शोध घेत आहे. मात्र, तलावाचा अंदाज आणि पाण्याचा विस्तार लक्षात घेता शोधकार्याला मर्यादा येत होत्या. बाजीरावभैया धर्माधिकारी यांनी तात्काळ या घटनेची गांभीर्यपूर्वक दखल घेतली. त्यांनी थेट तहसीलदारांशी संपर्क साधून घटनास्थळी अत्याधुनिक साधनांसह आपत्ती व्यवस्थापन ची टीम पाचारण करण्याची विनंती केली.

घटनेचे गांभीर्य ओळखून तहसीलदारांनी तातडीने डिझास्टर मॅनेजमेंटच्या टीमला पाचारण करण्याचे आदेश दिले आहेत. ही टीम लवकरच घटनास्थळी दाखल होऊन अत्याधुनिक बोटी आणि शोध साधनांच्या मदतीने सुमित कलशेट्टी यांचा शोध घेणार आहे. सध्या नगरपरिषदेचे शोधकार्य युद्धपातळीवर सुरू असून, डिझास्टर टीम आल्यानंतर या शोधकार्याला अधिक वेग मिळण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे चांदापूर आणि परळी परिसरात मोठी खळबळ उडाली असून सुमित कलशेट्टी यांच्या सुरक्षिततेसाठी नागरिक प्रार्थना करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad Crime: जीवे मारण्याची धमकी देत मागितली खंडणी; भाजपच्या नेत्यावर गुन्हा दाखल

आंबिवलीत पूजेदरम्यान दोन कुटुंबीयांमध्ये वाद; महिलांची एकमेकांना धक्काबुक्की, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

धक्कादायक! रात्रीच्या प्रवासादरम्यान खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग

2 लाखांना विकला मतदानाचा अधिकार, कराडमध्ये लोकशाहीचा लिलाव

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा बालेकिल्ला ढासळला; दोन पराभव पचवलेल्या प्रशांत किशोर यांचा करिश्मा

SCROLL FOR NEXT