बापरे! नगरपालिका कार्यालयात रंगली गटारी अध्यक्षांचे दालन बनवले परमीट रुम राजेश काटकर
महाराष्ट्र

बापरे! नगरपालिका कार्यालयात रंगली गटारी अध्यक्षांचे दालन बनवले परमीट रुम

जिल्ह्यातील गंगाखेड येथे नगर परिषद कार्यालयातच गटारी साजरी केल्याचा संतापजनक प्रकार ऊघडकीस आला आहे.

राजेश काटकर

परभणी: जिल्ह्यातील गंगाखेड येथे नगर परिषद कार्यालयातच गटारी साजरी केल्याचा संतापजनक प्रकार ऊघडकीस आला आहे. स्वतः नगरसेवकच या पार्टीत बिर्याणीवर ताव मारताना दिसत आहेत. इतकंच काय कमी होतं, त्यात या पार्टीत सहभागी लोकांनी अध्यक्ष आणि ऊपाध्यक्षांच्या दालनाचा पिण्यासाठी परमिट रूम म्हणून वापर केल्याचीही माहिती आहे.

दरम्यान, जेथे पार्टी सुरू होती त्या बाळासाहेब ठाकरे सभागृहात cctv असल्याने सर्व घटना cctv मध्ये कैद झाली आहे. घटनेचा व्हीडिओ सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे. काल रविवारी दर्श आमावस्या होती. सोमवार पासून श्रावण महिना सुरू होत असल्याने या आमावस्येला गटारी आमावस्या म्हणुनही ओळखले जाते.

हा दिवस मांसाहार करणारांसाठी पर्वणीच असतो. याचाच निमीत्त साधत गंगाखेड नगर परिषदेतील एका लोकप्रतिनिधीने गटारी साजरी करण्यासाठी कोणतेही हॉटेल अथवा ढाब्याऐवजी चक्क नगर परिषद कार्यालयच निवडले. आणि सायंकाळी 6 नंतर न. प. च्या मुख्य सभागृहात बिर्याणीचे भांडे आणण्यात आले. ज्या सभागृहात नगर परीषदेच्या सर्वसाधारण सभा होतात त्या स्व. बाळासाहेब ठाकरे सभागृहात आणि त्यांच्याच फोटोच्या साक्षीने बिर्याणीची पंगत सुरू झाली.

या पंगतीत काही जण आधीच मद्यपान करून आले होते. तर कांहीनी सभागृहालगत असलेल्या अध्यक्ष आणि ऊपाध्यक्षांच्या दालनाला परमिट रूम बनवून तेथेच मद्यपान केल्याची माहिती आहे. या बिर्याणी पार्टीचे सीसीटीव्ही फुटेज चांगलेच व्हायरल झाले असून झाल्या प्रकाराबाबत शहरासह जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणात सहभागी नगरसेवक आणि पार्टी करण्यास परवानगी देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नगराध्यक्ष, मुख्याधिकारी काय कारवाई करतात? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhattisgarh Encounter : छत्तीसगडमध्ये मोठी कारवाई; एनकाउंटरमध्ये ५ नक्षलवाद्यांचा खात्मा, DRG जवान शहीद

Virat Kohli Century: विराट कोहलीचं सलग दुसरं शतक, गौतम गंभीरची रिअॅक्शन व्हायरल

Vasai-Virar: वसई-विरारमध्ये भाजपची ताकद वाढली, बड्या नेत्यांसह शेकडो पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश

Glowing Skin Care Tips: दिवसभरच्या थकव्यामुळे चेहरा काळवंडलाय? या सोप्या टिप्स फॉलो करा

Maharashtra Live News Update: - नगरपालिकेच्या निवडणुकांच्या कार्यक्रमात त्रुटी आढळणे हेच निवडणूक आयोगाचे मोठे फेल्युअर- शशिकांत शिंदे

SCROLL FOR NEXT