Parbhani Dengue News Saam tv
महाराष्ट्र

Parbhani Dengue News : परभणीत डेंग्युने तरुणाचा मृत्यू; खाजगी रुग्णालयात सुरु होते उपचार

राजेश काटकर

परभणी : पावसाळा सुरु झाल्यानंतर साथरोगांचा फैलाव सुरु झाला आहे. दरम्यान अनेक ठिकाणी डेंग्यूच्या आजाराची अनेकांना लागन झाली आहे. दरम्यान परभणी शहरात डेंग्युच्या तापाने एका २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान तरुणाचा मृत्यू झाला असून आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. 

पावसाळा सुरु झाल्यानंतर साथरोगानी डोके वर काढले आहे. थंडी तापाचे रुग्णांची संख्या अधिक असल्याने रुग्णालयांमध्ये देखील गर्दी झालेली पाहण्यास मिळत आहे. तर (Dengue) डेंग्यूच्या आजाराचे रुग्ण राज्यातील अनेक शहरांमध्ये आढळून येत आहेत. त्यानुसार परभणी शहरात देखील डेंग्यू सदृश्य आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान यात (Parbhani) परभणी शहरातील संभाजी नगर मधील रहिवाशी आदित्य अनिल जोंधळे (वय २३) याला देखील डेंग्यू सदृश्य आजाराची लागण झाली होती. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

आदित्य जोंधळे याला ताप येऊन पोट दुखत असल्याचा त्रास जाणवत होता. यानंतर तरुणाला २० जुलैला उपचारासाठी शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवस उपचार सुरु असताना त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला. मयत युवक हा डिजेचा व्यवसाय करत होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Navra Maza Navsacha 2' ची पाचव्या आठवड्यातही बक्कळ कमाई; बॉक्स ऑफिसवर ठरला ब्लॉकबस्टर चित्रपट

Rohit sharma: होय..माझा 'तो' निर्णय चुकला! रोहित शर्माने का मागितली माफी?

Bus Accident : घाट रस्त्यात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

Maharashtra Politics: पुणे, सोलापूर ते लातूर, संगमनेर; काँग्रेसची उमेदवारी यादी रवींद्र धंगेकरांनी टाकली अन् डिलीट केली

Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

SCROLL FOR NEXT