Farmar End Life In Parbhani Saam Tv
महाराष्ट्र

Parbhani News: परभणीत तरुण शेतकऱ्याची आत्महत्या, दुष्काळाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल

Farmar End Life In Parbhani: परभणीमध्ये तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या शेतकऱ्याच्या आत्महत्येमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

Priya More

राजेश काटकर, परभणी

दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना परभणीमध्ये समोर आली आहे. परभणीतल्या (Parbhani News सेलू तालुक्यामध्ये ही घटना घडली आहे. घरामध्येच गळफास लावून या शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. शेतकऱ्याच्या आत्महत्येमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परभणीच्या सेलू तालुक्यातील हिस्सी येथे ही घटना घडली आहे. हिस्सी गावामध्ये राहणारे वैभव रामप्रसाद गात (३३ वर्षे) या शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. वैभव यांच्याकडे ३ एकर शेती आहे. या शेतीवर ते उदरनिर्वाह करत होते. शेतीसाठी त्यांनी देऊळगाव येथील बँक ऑफ महाराष्ट्रमधून एक लाखांचे कर्ज घेतले होते.

दरम्यान नापिकी, दुष्काळ यामुळे शेतातून काहीच उत्पन्न निघत नव्हते. त्यामुळे त्यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर वाढत गेला. हे कर्ज कसे फेडावे याच्या चिंतेत ते होते, असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून वैभव गात या शेतकऱ्याने गुरुवारी मध्यरात्री राहत्या घरातील पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली.

वैभव गात यांनी आत्महत्या केल्याचे लक्षात येताच त्यांच्या आईने तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. याप्रकरणी सेलू पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. वैभव गात यांच्या पश्चात आई, वडील, बहीण, भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. घरातील कर्ता व्यक्ती गेल्यामुळे गात कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CIDCO: नवी मुंबईकरांसाठी गुड न्यूज! सिडको भूखंडांचे होणार फ्री-होल्डमध्ये रूपांतर; कशी असणार प्रक्रिया?

Maharashtra Live News Update : मागाठाणे बस डेपोतील कंत्राटी बस चालक संपावर

Ahilyanagar : शेतकरी पती- पत्नीचा संशयास्पद मृत्यू; परिसरात खळबळ, घातपात कि आत्महत्या? कारण गुलदस्त्यात

Best Mileage Tips: गाडी वेगात चालवायची की हळू? कोणता वेग देतो सर्वाधिक मायलेज?

Nashik : नाशिमध्ये पावसाचा फटका! निफाड रेल्वेस्थानकाबाहेर ३ ते ४ फुटांपर्यंत पाणी, वाहन चालकांचे हाल | VIDEO

SCROLL FOR NEXT