Parbhani electric shock two young man death Saam TV
महाराष्ट्र

Parbhani News: अचानक लाईट आली अन् अनर्थ झाला; कुलर बसवताना दोन तरुणांना मृत्युने कवटाळलं

Parbhani News: घरात कुलरचे काम करत असताना विजेचा धक्का लागून दोन तरुणांचा मृत्यू झाला.

राजेश काटकर

Parbhani News: परभणी जिल्ह्यातून एक दुर्देवी घटना समोर आली आहे. घरात कुलरचे काम करत असताना विजेचा धक्का लागून दोन तरुणांचा मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना शहरातील सोमवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास रामकृष्ण नगर भागात घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. (Latest Marathi News)

संभाजी अशोक थोरे (२३, रा.रामकृष्ण नगर) आणि रोहित शिवाजी उमरीकर (२२, रा.रामकृष्ण नगर) अशी मृत्युमुखी पडलेल्या (Parbhani News) तरुणांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही तरुण रामकृष्ण नगर भागातील एका घरामध्ये कुलर बसविण्याचे काम करीत होते.

त्यावेळी विजेचा दाब कमी अधिक होत होता. अचानक संभाजी थोरे या तरुणाला विजेचा जोरदार धक्का लागला. त्याला वाचवण्यासाठी रोहित उमरीकर हा धावला. मात्र रोहितलाही विजेचा जोरदार धक्का बसला. दरम्यान, दोन्ही तरुणांना वसमत रोडवरील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. (Breaking Marathi News)

मात्र, डॉक्टरांनी दोघांनाही तपासून मृत घोषित केले. यानंतर सदरील दोघांचे मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले आहेत. एकाच वेळी दोन तरुणांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनिषा मांढरेंचे मॉडर्न महाविद्यालयातून निलंबन

LPG Gas Booking : सिलेंडरच्या बुकिंगचा मेसेज आलाय, पण DAC कोड खरा आहे की खोटा? कसं ओळखाल?

अनैतिक संबंधातून वहिनीला संपवलं, नंतर नेपाळमध्ये पलायन करण्याचं ठरवलं अन् कल्याण पोलिसांचा झारखंडमध्ये अटकेचा थरार

कल्याणमध्ये 5 भटक्या कुत्र्यांची निर्घृण हत्या; मृतदेह नाल्यात फेकल्याचा संतापजनक प्रकार

सत्ताधारी महिला आमदाराच्या ताफ्यावर हल्ला; भररस्त्यात गाडी अडवत केली जातीवाचक शिवीगाळ, सुरक्षा रक्षकांना मारलं

SCROLL FOR NEXT