Parbhani Latest News Saam tv
महाराष्ट्र

Parbhani News: परभणीत मराठा आरक्षणासाठी आत्महत्या सत्र सुरूच; गेल्या ४८ तासांत दोन तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

Parbhani Latest Marathi News: मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकार दरबारी प्रलंबित आहे. याचदरम्यान, परभणीत गेल्या ४८ तासांत मराठा समाजाच्या दोन तरुणांनी आत्महत्या केली आहे.

राजेश काटकर

Parbhani News:

राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा समाजाकडून मराठा आरक्षणाची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकार दरबारी प्रलंबित आहे. याचदरम्यान, परभणीत गेल्या ४८ तासांत मराठा समाजाच्या दोन तरुणांनी आत्महत्या केली आहे. (Latest Marathi News)

परभणीत गेल्या दोन दिवसांत मराठा समाजाच्या दोन तरुणांनी जीवन संपवलं आहे. परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील पिंपरी झोला येथील २५ वर्षीय तरुणाने जीवन संपवलं आहे. पवन विष्णुकांत भिसे या तरुणाचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी पवनने चिठ्ठी लिहून जीवन संपवलं आहे.

'मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही म्हणून मी आत्महत्या करीत आहे. एकच मशीन मराठा आरक्षण, असा मजकूर पवनने चिठ्ठीत लिहिलं आहे. पवनने टोकाचं पाऊल उचलल्याने परिसरात शोकाकुल वातावरणात पसरलं आहे.

तरुणाने विष पिऊन संपवलं जीवन

मराठा आरक्षणासाठी एका 36 वर्षीय तरुणाने विषारी द्रव पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. परभणी तालुक्यातील आर्वी येथे ही घटना घडली. गुरुवारी सकाळी ही घटना घडली. सुनिल छत्रपती कदम (36) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

परभणी तालुक्यातील आर्वी येथील सुनिल कदम याने अंतरवाली सराटी येथे झालेल्या सभेला उपस्थिती लावली होती. त्यानंतर आर्वी गावात सुरु असलेल्या साखळी उपोषणातही सुनिल कदमचा सक्रीय सहभाग होता. या घटनेनंतर सकल मराठा समाज आक्रमक झाल्याचे दिसून आले. यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात ग्रामीण पोलिस, नानलपेठ पोलिसांनी बंदोबस्त लावला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandra Grahan 2025: ७ सप्टेंबरला दुर्मिळ चंद्रग्रहण, या ३ राशींना होणार भरपूर फायदा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची शेवटची आरती संपन्न

ITR Filling: आयटीआर फाइल करण्याची डेडलाइन वाढण्याची शक्यता, आतापर्यंत फक्त ४.५६ कोटी करदात्यांनी केलाय अर्ज

Ganesh Visarjan 2025: बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूकीत पायांची काळजी कशी घ्याल? हे उपाय करतील तुमची मदत

Baaghi 4 OTT Release : जबरदस्त ॲक्शन अन् रोमान्सचा धमाका, टायगर श्रॉफचा 'बागी ४' कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार?

SCROLL FOR NEXT