Parbhani News Saam tv
महाराष्ट्र

Parbhani News : नाल्याच्या पुरात दोन महिला गेल्या वाहून; एका महिलेचा मृत्यू

Parbhani News : परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात सोमवारी सायंकाळच्या वेळेस पावसाने जोरदार हजेरी लावली. या दरम्यान मानवत तालुक्यातील मानोली येथे ढगफुटी सदृश्य पाऊस झाला

राजेश काटकर

परभणी : परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात सोमवारी सायंकाळी ढगफुरी सदृश्य पाऊस झाला. यामुळे नाल्यात पाणी आले होते. यावेळी शेतातून घरी परतत असताना दोन महिला नाल्याच्या पुरात वाहून गेल्या होत्या. यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या महिलेला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात सोमवारी सायंकाळच्या वेळेस पावसाने जोरदार हजेरी लावली. या दरम्यान मानवत तालुक्यातील मानोली येथे ढगफुटी सदृश्य पाऊस (Heavy Rain) झाला. दरम्यान पाऊस आल्याने शेतात गेलेल्या दोन महिला घरी परत येत होत्या. मात्र गावालगतच्या नाल्याला मोठ्या प्रमाणात पाणी आले होते. या पाण्यात उतरून निघण्याचा प्रयत्न दोघांनी केला. मात्र महिलांना पाण्याचा अंदाज न आल्याने दोन्ही महिल्या वाहून गेल्या.  

आज सकाळी सापडला मृतदेह 

सदर घटनेची माहिती गावात कळाल्यानंतर गावाकऱ्यांनी शोध घेत रंजना भास्करराव सुरवसे यांनी झाडाला पकडल्याने त्या सापडल्या. बेशुद्ध अवस्थेत त्यांना मानवत ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र सुनीता धुराजी लव्हाळे या वाहून गेल्याने गावाकऱ्यांनी शोध घेतला असता सापडल्या नाही. आज सकाळी सुनीता लव्हाळे मानोलीपासून दहा किलोमीटर अंतरावर झोडगाव शिवारात सुनीता लव्हाळे या मृत (Death) अवस्थेत मिळून आल्या. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

SCROLL FOR NEXT