Parbhani News: आदिवासी मजुराला कारखान्याच्या कंत्राटदाराने उचलून नेऊन मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिंतूर तालुक्यातील केहाळ गावामध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. ही संतापजनक घटना चार महिन्यांपूर्वी घडली असून आत्ता या मारहाणीचा व्हिडिओ समोर आला आहे. (Latest Marathi News)
याबाबत अधिक माहिती अशी की, जिंतूर तालुक्यातील केहाल गावचा माणिक घोगरे या आदिवासी मजुराचे 25 नोव्हेंबर रोजी अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर त्याला एका खांबाला बांधून मारहाण करण्यात आली. तसेच मारहाणीनंतर त्याच्याकडून दोन लाख रुपये घेतल्यानंतर त्याला सोडून दिला असल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे.
या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ सध्या समोर आला असून त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. (Parabhani News)
दरम्यान, या प्रकरणातील आरोपींच्या विरोधात ॲट्रॉसिटी कायद्यानुसार अपहरण, डांबून मारहाण आणि खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाकपच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणातील दोषींवर कारवाई न झाल्यास सोमवारी मोर्चा काढणार असल्याचा इशाराही भाकपने दिला आहे. (Crime News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.