Pune Water Supply News: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी (Water) आहे. ऐन उन्हाळ्यात पुण्यावर पाणी कपातीचे संकट ओढावणार आहे. त्यामुळे पुणेकरांवर (Pune) पुन्हा पाणी जपून वापरण्याची वेळ (Water supply) आली आहे. कारण पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या अनेक प्रकल्पाचा साठा घसरला आहे. यामुळे पुणे शहरावर पाणी कपातीचे संकट निर्माण झाले आहे. (Latest Marathi News)
याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे शहरातील नागरिकांना आता पाणी जपून वापरावे लागणार आहे. पावसाळा सुरु होईपर्यंत पाणी कपातीचे संकट पुणेकरांवर असणार आहे. कारण पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या अनेक प्रकल्पाचा साठा घसरला आहे. तसेच जून-जुलै महिन्यांत समाधानकारक पाऊस पडणार नसल्याचा अंदाज आहे.
त्यामुळे पुणेकरांना आतापासून उपलब्ध पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. या संदर्भात जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत पुणे महापालिका अधिकाऱ्यांची बैठक पार पडली असून पुणे महापालिका आतापासून पाण्याचे नियोजन करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील भीमा खोऱ्यातील २६ धरणांपैकी २१ धरणांमधील जलसाठा घसरला आहे. हा जलसाठा ५० टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. त्यामुळे पुढील चार महिन्यांचे योग्य नियोजन करावे लागणार आहे.
पुणे जिल्ह्यातील खडकवासला,चासकमान, वीर, डिंभे, विसापूर, उजनी या धरणांतून पाण्याचा डाव्या, उजव्या कालव्याला पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. ज्याचा वापर शेतीसाठी केला जात आहे. याशिवाय खडकवासला, पवना, गुंजवणी, भाटघर, नीरा देवघर या धरणांतून बंद जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळी कमी होताना दिसत आहे. (Pune Water Supply)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.