Parbhani News
Parbhani News Saam tv
महाराष्ट्र

Parbhani News: विद्यार्थ्यांना बिस्किटसाठी दिले शंभर रूपये; वर्गखोलीत जावून शिक्षकाने उचलले टोकाचे पाऊल

राजेश काटकर

परभणी : गंगाखेड तालुक्यातील धारासुर तांड्यावरील जिल्हा परिषद शाळेतील (Teacher) शिक्षकाने वर्ग खोलीत गळफास घेत आत्‍महत्‍या केली. विठ्ठल अनंत रत्नपारखे असे मयत शिक्षकाचे नावे आहे. (Letest Marathi News)

गंगाखेड (Parbhani) शहरात राहणारे शिक्षक रत्नपारखे आज सकाळी नेहमीप्रमाणे धारासुर तांडा येथील जिल्हा परिषद शाळेत (ZP School) गेले. त्यांनी शाळा उघडताच विद्यार्थ्यांना बिस्किट खाण्यासाठी शंभर रुपये दिले. बिस्कीटासाठी पैसे मिळताच काही विद्यार्थी बिस्किट आणण्यासाठी दुकानावर गेले. तर काही विद्यार्थी शाळेच्या मैदानात खेळत होते. यानंतर रत्‍नपारखे यांनी वर्गखोलीतच गळफास घेतला.

आत्‍महत्‍येचे कारण अस्‍पष्‍ट

घटनेची माहिती गावातील नागरिकांना समजल्यानंतर नागरिकांनी शाळेकडे धाव घेतली. तसेच उपशिक्षणाधिकारी शौकत पठाण, गटशिक्षणाधिकारी बालाजी सगट यांनी शाळेला भेट देऊन पाहणी केली आहे. दरम्यान शिक्षक रत्नपारखे यांनी कोणत्या कारणाने आत्महत्या केली आहे; हे मात्र समजू शकलेले नाही. शिक्षकाने शाळेमध्येच आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Update : PM मोदींच्या दिवसभरात ७ बैठका; चक्रीवादळ, उष्णतेच्या लाटेचा आढावा घेणार

Pandharpur News | अडीच महिन्यानंतर विठूरायाचं पदस्पर्श दर्शन सुरु

Varsha Gaikwad News : वर्षा गायकवाड यांच्या अडचणी वाढणार? भाजपच्या 'त्या' तक्रारीची निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल

Pune Porsche Car Accident News |अल्पवयीन आरोपीची उडवाउडवीची उत्तरं, सहकार्य करण्यासही नकार

Sonakshi Sinha Birthday : सलमान खानने 'दबंग'साठी सोनाक्षी सिन्हाकडे कोणती अट ठेवली होती ?, जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT