Satara News
Satara NewsSaam tv

Satara News: दुर्दैवी घटना..चॉकलेट घशात अडकून एक वर्षाच्या मुलीचा मृत्यू

दुर्दैवी घटना..चॉकलेट घशात अडकून एक वर्षाच्या मुलीचा मृत्यू
Published on

सातारा : चॉकलेट घशात अडकल्याने एक वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाल्याची घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. शर्वरी सुधीर जाधव असे त्या मुलीचे नाव आहे. (Maharashtra News)

Satara News
Nandurbar News: प्रकाशा येथे खोदकामात आढळली दहाव्या शतकातील पुरातन मूर्ती

कर्मवीरनगर, कोडोली (ता. सातारा) येथील शर्वरी सुधीर जाधव या एक वर्षीय मुलीला तिच्या शेजारी राहणाऱ्या एका लहान मुलीने जेली चॉकलेट खाण्यास दिले. तिने चॉकलेट तोंडात टाकल्यानंतर ते तिच्या घशात अडकल्याने ती खोकू लागली. यानंतर ती बेशुद्ध पडली.

रुग्णालयात नेले पण..

मुलीच्‍या घशात चॉकलेट अडकल्‍याचे तिच्या कुटुंबियांच्या लक्षात आले. यानंतर तिला तातडीने सातारा येथील जिल्हा रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com