Parbhani News Saam tv
महाराष्ट्र

Parbhani News : जूनमध्येही कापसाची खरेदी; सेलूत पाच लाख क्विंटल कापूस खरेदी

राजेश काटकर

परभणी : यंदा कापसाला चांगला भाव मिळेल; अशी अपेक्षा शेवटपर्यंत शेतकऱ्यांना होती. मात्र, जून महिन्यापर्यंतही कापसाच्या भावात वाढ झाली नसल्याने घरात ठेवलेला कापूस शेतकऱ्यांनी विक्रीस आणला आहे. सेलू येथील निमशासकीय व खासगी बाजार समितीकडून ५ लाख ३७ हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. 

दोन वर्षांपूर्वी कापसाला चांगला दर (Cotton Price) मिळाल्याने गतवर्षी कापसाची लागवड वाढली होती. परंतु शेतकऱ्याला अपेक्षित दर मिळाला नाही. यामुळे भाव वाढतील या आशेवर शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक करून ठेवली होती. नोव्हेंबर महिन्यापासून कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली होती. कापूस खरेदी हंगामाच्या (Parbhani) अखेरीस भाववाढ होईल; असा अंदाज शेतकऱ्यांनी बांधला होता. परंतु, जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत कापसाच्या भावात अपेक्षित वाढ झाली नाही. 

दरम्यान, आता नवीन कापूस लागवड करण्याची वेळ आली असताना घरात साठवून ठेवलेला कापूस आता नाईलाजाने विक्रीसाठी काढावा लागत आहे. यामुळे (Selu) सेलू येथील निमशासकीय बाजार समितीने आजपर्यंत २ लाख ८७ हजार तर खासगी बाजार समितीकडून २ लाख ५० हजार एवढी कापूस खरेदी केली असून जून महिन्यातही कापसाची आवक सुरूच आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bus Accident : घाट रस्त्यात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

Maharashtra Politics: पुणे, सोलापूर ते लातूर, संगमनेर; काँग्रेसची उमेदवारी यादी रवींद्र धंगेकरांनी टाकली अन् डिलीट केली

Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

Poha Chivda: दिवाळीसाठी घरी खमंग अन् कुरकुरीत बनवा पोह्यांचा चिवडा

Mithila Palkar: वेब क्विन करतेय इटलीत भटकंती; पाहा फोटो

SCROLL FOR NEXT