sarpanch ladli bahin yojana  saam tv
महाराष्ट्र

Sarpanch Ladli Bahin Yojana : लग्नादिवशी गावातील वधूस मिळणार साेन्याची अंगठी, भांडी; जाणून घ्या 'सरपंच लाडली बहीण' योजना

या याेजनेमुळे वधूपित्यास मोठा हातभार लागणार आहे. या योजनेची इतर गावांतील सरपंच मंडळींनी माहिती घेत लागू केल्यास ही योजना ग्रामस्थांच्या फायद्याची ठरेल.

राजेश काटकर

Parbhani :

जागतिक महिला दिनाच्या (international women's day) पार्श्वभूमीवर परभणी येथील कौडगाव ग्रामपंयातीचे (kaudgaon grampanchayat) सरपंच यांनी काैडगाव या आपल्या गावात 'सरपंच लाडली बहीण' योजनेची (sarpanch ladli bahin yojana) घाेषणा केली आहे. ग्रामस्थांनी बिनविराेध निवडून दिल्याने सरपंच उद्धव नागरे यांनी महाशिवरात्री (mahashivratir 2024) दिवशी हा संकल्प केल्याचे सांगितले. त्यासाठी येणारा खर्च ते स्वत: करणार आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

केंद्र आणि राज्य शासन मुलींसाठी चांगल्या योजना राबवत आहे. त्याच अनुषंगाने परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील कौडगाव येथील सरपंच उद्धव नागरे यांनी गावातील मुलींसाठी महाशिवरात्रीपासून 'सरपंच लाडली बहीण' योजना अंमलात आणली आहे. या योजनेचे शुक्रवारी ग्रामस्थांच्या हस्ते उ‌द्घाटन झाले.

कौडगाव येथील सरपंचांनी सुरू केलेल्या या सरपंच लाडली बहीण योजनेंतर्गत मुलीच्या लग्नात अन्नदान, भांडे किंवा सोन्याची अंगठी यापैकी एक गाेष्ट मोफत दिली जाणार आहे. विशेष म्हणजे ही योजना केवळ कौडगावसाठी मर्यादित आहे. (Maharashtra News)

सरपंच लाडली बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी टीसी, आधारकार्ड, लग्नपत्रिका व दोन फोटो या कागदपत्रांची आवश्यकता आहे. या याेजनेमुळे वधूपित्यास मोठा हातभार लागणार आहे. या योजनेची इतर गावांतील सरपंच मंडळींनी माहिती घेत लागू केल्यास ही योजना ग्रामस्थांच्या फायद्याची ठरेल.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court: चुकीच्या वक्तव्याची तुलना द्वेषपूर्ण भाषणाशी होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले

Numerology: या तारखेला जन्मलेल्या व्यक्ती असतात लकी; प्रेमात अन् करिअरमध्ये मिळते यश

Maharashtra News Live Updates: तासगावमध्ये शरद पवारांची सभा, अजित पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेणार का?

Gold Price Today: 5000 हजारांनी स्वस्त झाल्यानंतर सोन्याचे भाव वाढले; 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती?

Devendra Fadanvis : मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, पाहा Video

SCROLL FOR NEXT